घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंवरील ट्विटचा विपर्यास - अमृता फडणवीस

आदित्य ठाकरेंवरील ट्विटचा विपर्यास – अमृता फडणवीस

Subscribe

मुलाखतीत अनेक प्रश्नांचा उलगडा अमृता फडणवीसांनी केला. राजकारणात उडी घेणार नसल्याचं देखील त्या म्हणाल्या.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कोल्डवॉर सुरु होते. पर्यावरम मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना “सेनेने बांगड्या घातल्या” या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावली होती. त्यावर अमृता फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना अमृता पडणवीसांनी आदित्य ठाकरेंवरील ट्वीटचा विपर्यास केला, असा खुलासा केला आहे.


हेही वाचा – या सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर – फडणवीस

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नाला अमृता यांनी नकारार्थी उत्तर देत “मला मुळातच राजकारण आवडत नाही. मी राजकारणात उडी घेण्याची शक्यताच नाही.” दरम्यान, आपले कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वैर नाही, असे त्यांनी सांगितले. आदित्य यांनी महिलांवरच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले, म्हणून मला बोलावे लागले. देवेंद्र फडणवीस म्हणजे महिलांना सशक्त करणारी व्यक्ती आहे. त्यांच्याविषयी असे कोणी बोलत असेल तर मला गप्प राहता येणारच नाही. मला ते सहनच होऊ शकत नाही. म्हणून मी त्यांना खोडून काढले, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -