घरक्राइमAmruta Fadnavis : मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावे आरोपपत्रात; अनिल जयसिंघानी...

Amruta Fadnavis : मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावे आरोपपत्रात; अनिल जयसिंघानी खंडणी प्रकरण

Subscribe

 

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणी मागितल्याची ध्वनीचित्रफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्याची धमकी आरोपी अनिक्षा जयसिंघानी दिली होती. फडणवीस यांची कारकीर्द संपवण्याचा इशारा जयसिंघानी यांनी दिला होता. हा पुरावा मलबार हिल पोलिसांनी आरोपत्रात जोडला आहे.

- Advertisement -

जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याकडे मागितलेल्या खंडणीचे आरोपपत्र गेल्या महिन्यात मलबार हिल पोलिसांनी दाखल केले. ७३३ पानी या आरोपपत्रात १३ साक्षीदारांची साक्ष आहेत. अनिल व अनिक्षा जयसिंघानी आणि अमृता फडणवीस यांच्यात झालेल्या संभाषणाचा तपशील आरोपपत्रात आहे. अनिक्षाने अमृता फडवणवीस यांना पाठवलेले धमकीचे संदेशही आरोपपत्रात आहेत. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या धमक्यांमुळे तिचा फोन घेणे बंद केले होते. तिचा मोबाईलही ब्लॉक केला होता. मोबाईल ब्लॉक केल्यामुळे तिचे वडील अनिल जयसिंघानी रागावले आहेत. ते तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हानी पोहोचवतील असा धमकीचा मेसेज अनिक्षाने अमृता यांना पाठवला होता. हा मेसेज आरोपपत्रात जोडण्यात आला आहे. हा मोठा राजकीय मुद्दा करुन फडणवीस यांना लक्ष केलं जाईल. त्यांच उपमुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. त्यांची राजकीय कारकीर्द संपू शकते, असा इशारा अनिक्षाने अमृता फडणवीस यांना दिला होता, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. ती कपडे, दागिने आणि शूज डिझाइन करते. अनिक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिच्या डिझाईन केलेल्या अॅक्सेसरीज घालण्याची, तिच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी आणि विक्रीत मदत करण्याची विनंती अनिक्षाने अमृता फडणवीस यांना केली होती.

- Advertisement -

अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधून त्यांच्याशी मैत्री केली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत अनिक्षाने फडणवीस यांना विविध आमिषे दाखवली. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवले असल्याचे तिने सांगितले. यातून बाहेर काढण्याकरता तिने अमृता फडणवीसांना एक कोटींची ऑफर दिली होती. तसंच, अनिल जयसिंघानी यांना काही बुकी माहिती आहेत. या बुकींवर धाड टाकून पैसे कमावता येतील, असंही आमिष अनिक्षाने अमृता फडणवीस यांना दाखवलं होतं, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती. त्यानंतर मलबारहिल पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. अनिक्षाला अटक केली. नंतर अनिल जयसिंघानीयाला पोलिसांनी गुजरात येथून अटक केली.  अनिक्षाला जामीनही मंजूर झाला.

अनिल जयसिंघानियाला ईडीकडून अटक

दहा हजार कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला ईडीच्या अहमदाबाद युनिटने एप्रिल २०२३ मध्ये अटक केली. २०१५ सालचं हे प्रकरण आहे. त्यात जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या अहमदाबाद युनिटने जयसिंघानीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी पूर्ण झाल्यावर जयसिंघानीला ईडीने अटक केली. त्याआधी त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -