Amruta Fadnavis Vs Vidya Chavan : विद्या चव्हाण वि अमृता फडणवीस वादात देवेंद्र फडणवीसांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…

विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा 'डॉन्सिंग डॉल' म्हणून उल्लेख केला होता. या  उल्लेखाविरोधात आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाणांना थेट अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे.

Amruta Fadnavis Vs Vidya Chavan devendra fadanvis statement on amrita fadnavis files defamation suit against vidya chavan
Amruta Fadnavis Vs Vidya Chavan महिलांसंदर्भात वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळा; विद्या चव्हणांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यातील  वाद आता चांगलाच तापला आहे. विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा ‘डॉन्सिंग डॉल’ म्हणून उल्लेख केला होता. या  उल्लेखाविरोधात आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाणांना थेट अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. या वादावर आता विरोधी पक्ष नेते आणि अमृता फडणवीस यांचे पती देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “केवळ पक्षांनीच नाहीत महिलांसंदर्भात वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळल्या पाहिजेत.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

नेमका वाद काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेन गजारिया यांचा विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला. हा निषेध करत असताना विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावरही टीका केली. अमृता फडणवीस यांचा डान्सिंग डॉल असा उल्लेख विद्या चव्हाण यांनी केला. यावर अमृता फडणवीस यांनी कमालीचा संपात व्यक्त केला. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणत शाब्दित हल्ला चढवला.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत लिहिले की, ‘आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण,आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!’ असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.

यात अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाणांना थेट कायदेशीर नोटीस बजावत मानहानीचा दावा केला आहे. विद्या चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा कोर्टातच करावा, असे या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण?

‘रश्मी ठाकरे यांना राबडी देवी यांची उपमा दिली हे बरं झालं. जर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरे यांची व्हाईट प्रतिमा नाही आहे हे तरी मला या ठिकाणी भाजपवाल्यांना सांगावं वाटतं. दुसऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बायको तक्रार करताना तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे काय काय गुण उधळले त्या विषयी जर ट्वीट केले तर बरे होईल, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.


CoronaVirus Updates : देशात आज कोरोनाचे 1 लाख 41 हजार नवे रुग्ण, तर 285 रुग्णांचा मृत्यू