घरताज्या घडामोडी"तळकोकण" एक स्वर्गीय आविष्कार; भराडी देवीच्या यात्रेला येताय ना?

“तळकोकण” एक स्वर्गीय आविष्कार; भराडी देवीच्या यात्रेला येताय ना?

Subscribe

“तळकोकण”- एक स्वर्गीय अविष्कार…देवभूमी असं ज्याच् वर्णन होतं, अशी भूमी! इथल्या वातावरणात, इथल्या निसर्गात, इथल्या मातीत एक वेगळीच अनुभूती आहे. जगाच्या पाठीवर उदरनिर्वाहासाठी गेलेला कोकणी माणूस चतुर्थी नंतर कशाची मनस्वी वाट पहात असेल तर ती इथल्या ग्रामदेवतांच्या जत्रेची!! पण आंगणेवाडीची जत्रा म्हटली की, कोकणी माणसासोबत जगाच्या काना कोपऱ्यातून अक्षरशः जनसागर लोटतो, तो भराडी आईच्या जत्रोत्सवाला आंगणेवाडीची भराडी देवी ही देवी सातेरी व देवी माउलीचे तिसरे रूप मानले जाते.

अलोट गर्दीची व कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारी ही जत्रा आंगणेवाडीची जत्रा म्हणून जगप्रसिद्ध आहे. या गावातील आंगणे कुटुंबिय व लग्न झालेल्या परगावी असलेल्या माहेरवाशीणीही या जत्रेला आवर्जून उपस्थित राहतात. या देवीची जत्रा फार पूरतान काळापासून सुरु असल्याचे म्हंटले जाते, तशी ही भराडी देवीची जत्रा साधारण केव्हा पासून सुरु झाली आणि याचा नेमका इतिहास काय? याबद्दल ठोस पुरावे नाहीत. मात्र साधारण ३०० वर्षांपासून भाविकांनी या देवीची पूजा अर्चा करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत अनेकांना या देवीच्या जागृतीची प्रचीती आलेली आहे. त्यामुळेच नवसाला पावणारी भराडीदेवी म्हणून या देवीचा नावलौकिक सर्व दूर पसरलेला आहे. देवीच्या जागृतेच्या महिम्यामुळेच या यात्रेसाठी दर वर्षी लाखो भाविक आंगणेवाडीला गर्दी करतात.

- Advertisement -

मालवण तालुक्यापासून सुमारे १५ कि.मी अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडीला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी बहुसंख्य लोकांची वस्ती ही आंगणे आडनावाच्या लोकांची आहे. भराड़ी ही आंगणे कुटुंबियांची कुलदेवी आहे. मात्र आता हे क्षेत्र केवळ आंगणे कुटुंबियांपुरते मर्यादित न रहता अन्य असंख्य भाविकांचे ही इष्टय झाले आहे. देवीच्या मंदिर खर्चासाठी पेशवे चिमाजी अप्पा यांनी इनाम म्हणून २ हजार एकर भरड व शेत जमीन दिली असल्याचे सांगितली जाते.

या देवीसंबंधी अनेक आख्यायिका प्रचिलित आहे. असे म्हणतात की, आंगणेवाडीतील एकजण चिमाजी अप्पा यांच्या सेवेत गुप्तहेराचे काम करत असे. त्याच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन देवी तुळजाभवानी माता आंगणेवाडीच्या भरडावर अवतरली. ही देवी या आंगणे नामक पुरुषाला दिसली. त्याच्या गाईने ही पाषाणरूपी देवी दाखवून दिली.

- Advertisement -

आंगणेवाडीतील प्रशस्त भरडावर स्वयंभू पाषाणरूपी ही देवी आहे. भरडावर प्रकटली म्हणून तिला भराडीदेवी म्हणले जाते. तिची पूजा-अर्चा सुरु झाली आणि ही देवी भाविकांना पावू लागली. या देवीची ख्याती आता तर अगदी सर्वदूर पसरली आहे. या देवीच्या प्रकटीकरण्याला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास असल्याचे म्हटले जाते. निश्चित स्वरूपाची माहीती कोठेही उपलब्ध नाही. आंगणेवाडी भराडीदेवीचे मंदिर हे खासगी आहे. पण भाविकांसाठी खुले आहे. या मंदिरात अनेक भाविक आपलं गाऱ्हाणं घालतात, नवस बोलतात. मनोभावे दर्शन घेणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

जत्रेच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे दर्शन घेतात. मुख्य उत्सव दिड दिवसांचा असतो. असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत पूजा होते. आंगणेवाडीच्या जत्रेचा पहिला दिवस पाहुण्यांचा आणि उरलेला अर्धा दिवस ग्रामस्थांचा असतो. प्रामुख्याने माहेरवाशिणी एकत्र येऊन पूजा करतात, महाप्रसाद करतात. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी अबोल राहून महाप्रसाद तयार करतात. देवीचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद दिला जातो. आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते.

आंगणेवाडीचे ग्रामस्थ एक नाटक बसवतात. हे नाटक भाविकांसमोर सादर केले जाते. मिरजेहून आमंत्रित केलेले गोंधळी देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. तळकोकणात प्रभाव निर्माण करण्यासाठी अनेक राजकारणी दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावतात. आंगणेवाडीतील बहुतेक व्यक्ती नोकरी अथवा व्यवसायच्या निमित्ताने कोकणाबाहेर विशेषतः मुंबईत वास्तव्यास आहेत. आंगणेवाडीचे क्षेत्रफळ साधारण ५३८.०२ हेक्टर म्हणजे सुमारे ८०० एकर एवढे आहे. या देवी संबंधी अनेक आख्यायिका प्रचिलित आहे .असे म्हणतात कि, आंगणेवाडीतील एकजण चिमाजी अप्पा यांच्या सेवेत गुप्तहेराचे काम करत असे .त्याच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन देवी तुळजाभवानी माता आंगणेवाडीच्या भरडावर अवतरली.हि देवी या अंगणे नामक पुरुषला दिसली व त्याच्या गाईने ही पाषाणरूपी देवी दाखवून दिली.

या यात्रोत्सवाची अजून एक खासियत आहे ती अशी की जत्रा महाराष्ट्रात आणि देशातही ठिकठिकाणी होतात त्यांच्या तिथी व तारखाही निश्चित असतात. परंतु भराडीदेवीच्या जत्रेची तारीख निश्चित नसते. भराड़ी आई स्वत कौल देऊन तारीख निश्चित करते आणि या तारखे ची महाराष्ट्राच्याच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांच्या कानाकोपऱ्यातून लहानापासून थोरांपर्यंत अनेक भाविक वाट पहात असतात. फार वर्षांपूर्वी या जत्रेचे स्वरूप वेगेळे होते. आता ते बदलले आहे. आंगणेवाडीच्या जत्रेला येणारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भराडीदेवी मुळेच या आंगणेवाडीच्या नावाचा प्रचार ,प्रसार सर्व दूर झाला. ही एक ते दीड दिवसांची जत्रा वर्षातून एकदाच येते.

इतर नागरिक व भाविकांसोबत

राजकारण आणि समाजकारण यांचा समन्वय घालत लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आंगणेवाडीच्या जत्रेला हमखास हजेरी लावतात.यावेळी स्थानिक व्यापारयासोबत बाहेर गावाहून आलेले व्यापारी फुले, नारळ, प्रसाद, पूजेची थाळी, देवीचे फोटो, खाजे विविध मिठाया, शोभेच्या वस्तू, शेतीची अवजारे अशा अनेक वस्तूंच्या विक्रीतून उत्तम उत्पन्न होते. यात्रेच्या काळात आंगणेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये दोन दिवस लोकांचा मोठा राबता असतो. आसपासची सर्व लहान-मोठी हॉटेल, लॉज भरलेले असतात. लाखो नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेतून स्थानिकांना चांगले उत्पन्न मिळते.


हेही वाचा : मुंबईत नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीवर एनसीबीची मोठी कारवाई


 

“तळकोकण” एक स्वर्गीय आविष्कार; भराडी देवीच्या यात्रेला येताय ना?
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -