घरCORONA UPDATELockdown:मेळघाटातल्या गरोदर, स्तनदा मातांसाठी सरसावल्या अंगणवाडी सेविका!

Lockdown:मेळघाटातल्या गरोदर, स्तनदा मातांसाठी सरसावल्या अंगणवाडी सेविका!

Subscribe

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरी भागांमध्ये मोठ्या संख्येने किराणा-भाजीपाल्याची दुकानं असून देखील इथल्या जनतेला टंचाई असल्याचे भास होत असतात. मात्र, आदिवासी भागात परिस्थिती भयंकर आहे. तिथे साधनं आणि सुविधांच्या कमतरतेमुळे आधीच कठीण असलेलं जीवनमान लॉकडाऊनमुळे अधिकच त्रासदायक झालं आहे. मेळघाट या कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातल्या आदिवासी गरोदर आणि स्तनदा मातांची या लॉकडाऊनच्या काळात अशीच अवस्था झाली होती. अंगणवाड्या बंद झाल्यामुळे त्यांना रोज डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत मिळणारा एक वेळचा सकस आहार बंद झाला आणि मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पण अंगणवाड्या बंद असूनही या आदिवासी मातांसाठी अंगणवाडी सेविका कंबर कसून उभ्या राहिल्या आहेत!

३८२९ आदिवासी मातांना लाभ

आदिवासी विकास विभागाच्या धारणी प्रकल्पांतर्गत बाल विकास योजनेतून या गरोदर आणि स्तनदा मातांना एक वेळचा सकस आहार पुरवला जात आहे. प्रकल्पातल्या १ हजार ४७५ गर्भवती माता आणि २ हजार ३५४ स्तनदा मातांना याचा लाभ मिळत आहे. आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. योग्य अंतर राखणे, नियमित हात धुणे, तोंडाला मास्क लावणे अशा सर्व उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करून या अंगणवाडी सेविका आहार पुरवत आहेत. याशिवाय ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातल्या १९ हजार ९८५ आदिवासी बालकांसाठी देखील पूरक आहार नियमितपणे सुरू आहे.

- Advertisement -

हा आहार अंगणवाडी सेविका स्वत: तयार करतात. यात उकडलेली अंडी आणि पोषक तत्व असणाऱ्या खिचडी भाताचा समावेश असतो. एकूण २३२ अंगणवाड्यांच्या परिक्षेत्रात येणाऱ्या मातांसाठी हा आहार रोज बनतो. सकाळी ८ ते दुपारी १२ या ४ तासांमध्ये हा आहार आदिवासी मातांपर्यंत घरपोच पोहोचवला जातो. यासाठी प्रवास करण्यासाठी अटल आरोग्य वाहिनीच्या २ रुग्णवाहिका देखील त्यांच्या मदतीला असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -