घरताज्या घडामोडीमुंबई पोलिसांकडून २४८ किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट, हजारो किलोंच्या विल्हेवाटीची माहिती गुलदस्त्यात

मुंबई पोलिसांकडून २४८ किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट, हजारो किलोंच्या विल्हेवाटीची माहिती गुलदस्त्यात

Subscribe

राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण आणि कारवाईवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये केंद्रीय यंत्रणा एनसीबीवर राजकीय नेत्यांनी ड्रग्ज प्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळेच प्रत्येक वर्षी अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे जप्त मुद्देमालाचे अखेर काय केले जाते आणि याची विल्हेवाट लावली जाते की नाही? हा प्रश्न उपस्थित होत असतो. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मागील ३ वर्षात ३४१४ किलो मुद्देमाल जप्त केला असून यांपैकी २०२१ साली जप्त केलेल्या २५९३ किलो पैकी फक्त २४८ किलो गांजा, एमडी आणि कोडेन याची विल्हेवाट लावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली असून अन्य मालाची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली हे सरकारी कामांची माहिती घेत असतात. राज्यात सध्या ड्रग्जप्रकरणावरुन राजकारण सुरु आहे. तर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील 3 वर्षात जप्त केलेला मुद्देमाल आणि विल्हेवाटची माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अनिल गलगली यांस वर्ष २०१९, वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ या वर्षात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९च्या वर्षामध्ये २५.२८ कोटींचा ३९५ किलो ३५ ग्रॅम माल तसेच १३४३ स्ट्रीप्स, ७५७७ बॉटल्स, १५५१ डॉट जप्त केला. पण या मालाची विल्हेवाट बाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. वर्ष २०२० मध्ये २२.२३ कोटींचा ४२७ किलो २७७ ग्रॅम माल तसेच १४ मिली ग्राम, ५१९१ बॉटल्स, ६६००० टॅब जप्त करण्यात आला होता. या मालाची विल्हेवाट लावली की नाही? याचीही माहिती दिली नाही. तर २०२१ च्या २५ ऑक्टोबर पर्यंत ८३.१८ कोटींचा सर्वाधिक माल जप्त करण्यात आला ज्यात २५९२ किलो ९३ ग्रॅम माल तसेच १५८३० बॉटल्स,१८९ एलएसडी पेपर्स चा समावेश होता. विल्हेवाट लावलेल्या मुद्देमालात गांजा २४८ किलो ३४४ ग्राम, एमडी ०.०१० किलो ग्रॅम आणि ३६८ कोडेन फॉस्फेट मिश्रित कफ सिरप बॉटल्स आहे.

अनिल गलगली यांच्या मते २०१९च्या वर्षात आणि २०२० ची माहिती दिलीच नाही आणि २०२१ मध्ये २४८ किलो मालाची लावलेल्या विल्हेवाटची माहिती दिली आहे. याबाबतीत आजही शंका असते आणि चर्चाही असते की पोलीस अधिकारी जप्त माल परस्पर विकतात आणि मोहास बळी पडतात. यासाठी प्रत्येक कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे जेणेकरून अंमली पदार्थाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईत सामान्य मुंबईकर सुद्धा आपले योगदान देईल, या आशयाचे पत्र अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मलिकांच्या अखत्यारीतीतील महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारात गैरप्रकार; ईडीचे ७ ठिकाणी छापे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -