घरताज्या घडामोडी2019 आणि 2020 च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

2019 आणि 2020 च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

Subscribe

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या सन 2019 आणि 2020 च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. योगेश वसंत त्रिवेदी आणि वृत्तवाहिन्यांमधून काम केल्या नंतर आरोग्य सेवेसाठी झोकून देऊन काम करणारे श्री. मंगेश चिवटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे 2020 चे तर सीएनएन 18 च्या मुंबई ब्युरो चीफ विनया देशपांडे पंडित आणि कोकण मीडिया चे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकण विभागीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या सन 2019 आणि 2020 च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली असून गुरुवार,6 जानेवारी 2021 रोजी पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे उभारण्यात आलेल्या ‘दर्पण’ सभागृहात होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी सांगितले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात लोकमत, कोल्हापूर चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

अन्य विभागवार जाहीर केलेले 2020 चे ‘दर्पण’ पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत –

- Advertisement -

1) मराठवाडा विभागातून आनंद कल्याणकर, नांदेड (आकाशवाणी प्रतिनिधी नांदेड).

2) विदर्भ विभागातून डॉ.रमेश गोटखडे, अमरावती (स्तंभलेखक, दै.हिंदुस्थान अमरावती).

- Advertisement -

3) पश्‍चिम महाराष्ट्रातून विनोद शिरसाट (पुणे), ज्येष्ठ समाजवादी लेखक व संपादक, हिरक महोत्सवी सा.साधना (पुणे).

4) उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून मिलींद सदाशिव चवंडके, पत्रकार, अहमदनगर.

5) कोकण विभागातून प्रमोद कोनकर, संपादक, सा.कोकण मिडिया व प्रमुख कोकण मिडीया, समाज माध्यम रत्नागिरी.

6) मुंबई विभागातून रविंद्र तुकाराम मालुसरे, संपादक, सा.पोलादपूर अस्मिता व अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई.

7) महिला विभागातून सौ.नम्रता आशिष फडणीस, विशेष प्रतिनिधी, दै.लोकमत, पुणे.

विशेष ‘दर्पण’ पुरस्कार :

1) शिवाजी पाटील, प्रतिनिधी, दै.लोकमत, मु.पो.तारळे खुर्द, ता.राधानगरी (कोल्हापूर).

2) अ‍ॅड.बाबुराव तुकाराम हिरडे, संपादक, सा.कमला भवानी संदेश, करमाळा (सोलापूर).

3) प्रा.रमेश आढाव, तालुका प्रतिनिधी, दै.तरुण भारत, फलटण (सातारा).

यापूर्वी गेल्यावर्षी जाहीर केलेले सन 2019 चे पुरस्कार कोव्हिड-19 च्या परिस्थितीमुळे समारंभपूर्वक देता आले नाहीत. तथापि आता सन 2019 आणि 2020 चे जाहीर केलेले पुरस्कार ‘कोव्हिड-2019’ च्या परिस्थितीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘दर्पण’ स्मारक प्रकल्पातील ‘दर्पण’ सभागृहात समारंभपूर्वक देण्यात येतील. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख  2,500/-, सन्मानपत्र, जांभेकरांचे चरित्र ग्रंथ, जांभेकरांचे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्य यावरील माहितीपट (सी.डी.), शाल, श्रीफळ असे आहे.

संस्थेतर्फे 2019 चे जाहीर दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार याप्रमाणे 

ज्येष्ठ संपादक पुरस्कार – शिवाजीराव अमृतराव शिर्के (संस्थापक संपादक, साप्ताहिक पवनेचा प्रवाह, पुणे), दर्पण पुरस्कार ‘कोकण विभाग’ – संतोष कुलकर्णी (प्रतिनिधी, दैनिक सकाळ, देवगड), श्रीमती विनया देशपांडे (ब्युरो चिफ, सीएनएन न्यूज 18, मुंबई), उत्तर महाराष्ट्र विभाग – निशांत दातीर (संपादक, निशांत / संत नगर टाईम्स, अहमदनगर), पश्‍चिम महाराष्ट्र विभाग – गुरुबाळ माळी (प्रतिनिधी, दैनिक महाराष्ट्र टाईम्स, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – दयानंज जडे (संपादक, दैनिक लातूर समाचार, लातूर), विदर्भ विभाग – अनिल जुगलकिशोरजी अग्रवाल (संपादक, दैनिक मातृभूमी व दैनिक अमरावती मंडळ, अमरावती), ज्येष्ठ पत्रकार श्री.शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत धाडसी पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार – राहुल तपासे (प्रतिनिधी, ए.बी.पी. माझा, सातारा), विशेष दर्पण पुरस्कार – सुभाष भांबुरे (प्रतिनिधी, दैनिक पुण्यनगरी, फलटण), जयपाल पाटील (संपादक, साप्ताहिक रायगडचा युवक, अलिबाग).

सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव (सातारा) व कृष्णा शेवडीकर (नांदेड) तसेच कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके (सातारा) यांनी अभिनंदन  केले आहे.


हेही वाचा – Guidelines for Home isolation : होम क्वारंटाईनबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी; काय आहेत सूचना?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -