घरCORONA UPDATECoronavirus : राज्यातील 180 हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

Coronavirus : राज्यातील 180 हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

Subscribe

यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे 18 हजार 466 रुग्ण आले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्या तिपटीने वाढत असल्याने राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे म्हटले जातेय. मात्र यात पुन्हा एकदा हेल्थ वर्कर आणि डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेत अधिक भर पडतेय. राज्यात आत्तापर्यंत 180 हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील सर्वाधिक रुग्णालयातील निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या 180 कोरोनाबाधित डॉक्टरांमध्ये मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील 61 निवासी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयातील सर्वाधिक डॉक्टर आणि इतर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

- Advertisement -

अवघ्या 48 तासांत राज्यातील 180 हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये जे. जे. रुग्णालयातील 51, सायनच्या 35, केईएमच्या 40, नायरच्या 35 आणि कूपरच्या 7 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. जे. जे. रुग्णालयातील 61 डॉक्टरना कोविडचा संसर्ग झाला आहे. यामुळे राज्यातील 20 हून अधिक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत.

- Advertisement -

यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे 18 हजार 466 रुग्ण आले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 653 रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. मात्र मुंबईत कोरोना संसर्गाने भयावह वेग पकडला आहे. या परिस्थितीबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जर प्रकरणे 20 हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लागू करावा लागेल. असा इशारा दिला आहे.


corona Virus: प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -