घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे गटाला पहिला धक्का!, विधानसभा उपाध्यक्षांकडून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता

एकनाथ शिंदे गटाला पहिला धक्का!, विधानसभा उपाध्यक्षांकडून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता

Subscribe

शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य तोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी अखेर मान्यता दिली. त्यामुळे शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पहिला धक्का बसला आहे.

शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेना विधिमंडळ गटनेता पदावर शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि सभागृहातील मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आताअजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला विधिमंडळाने मान्यता दिली असून तसे पत्र शिवसेनेला देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले असून दोन दिवसापूर्वी नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. कायद्यानुसार, पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो, झिरवळ म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पक्ष प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी गट नेता नेमायचा अधिकार आहे. तसेच पक्ष प्रमुखानीच प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची गटनेतेपदी तर मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती केली आहे आणि ते पत्र मी स्वीकारले आहे, असे झिरवाळ यांनी म्हटले होते. या. अनुषंगाने विधान मंडळाने अजय चौधरी यांची नियुक्ती मान्य केली असून हा शिंदे यांना पहिला धक्का असल्याचे मानण्यात येते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -