घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रढकांबे शिवारात सशस्त्र दरोडा; डोक्याला पिस्तूल लावून केली लूट

ढकांबे शिवारात सशस्त्र दरोडा; डोक्याला पिस्तूल लावून केली लूट

Subscribe

नाशिक : ग्रामीण भागातील दरोड्याचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावात सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास शस्त्रधारी दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकाने ही लूटमार केली आहे. एकीकडे कालच ग्रामीण पोलिसांनी दोन दरोड्याच्या गुन्ह्यांची उकल करत दरोडेखोरांना अटक केली होती. तर, दुसर्‍याच दिवशी दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकल्याने याबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

नाशिक शहरापासून नजीक असलेल्या दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत असलेल्या ढकांबे गावातील बोडके वस्तीवर हि घटना घडली आहे. पहाटे १ ते १:३० वाजेच्या सुमारास शेतकरी रतन शिवाजी बोडके राहत असलेल्या “शिवकथल” बंगल्यामध्ये पाच ते सहा दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्याआधीच त्यांनी बोडके यांच्या घराबाहेर असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याला गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर बोडके कुटुंब गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. एक-एक करत घरातील सदस्यांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोने, पैसे बाहेर काढण्यास सांगितले. घरातील २८ तोळे सोन्याचे दागिने, ४८ तोळे चांदी व ८ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली. दरोडेखोर निघून गेल्यानंतर बोडके कुटुंबियांनी मदतीसाठी धावा केला. या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत घबराट पसरली आहे. बोडके कुटुंब सध्या मोठ्या मानसिक तणावात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे. एकीकडे नाशिक ग्रामीणला लाभलेल्या नव्या अधीक्षकांनी गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पाऊल उचलेली असताना, ढकांबे येथील घटनेने पोलिसाना आव्हान दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -