आशा भोसलेंकडून राज ठाकरेंची विचारपूस; ‘शिवतीर्था’वर जाऊन घेतली भेट

म्हणूनच राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अशा भोसले राज यांना भेटायला त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास स्थानी गेल्या होत्या.

मुंबई : ख्यातनाम गायिका आशा भोसले यांनी आज ‘शिवतीर्था'(shivtirth)वर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांची अलीकडेच लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आशाताईंनी(asha bhsle) राज यांची भेट घेतली.

हे ही वाचा- Raj Thackeray- राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेपूर्वी टीझर व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(mns) प्रमुख राज ठाकरे(raj thackeray) आणि दिग्गज गायिका अशा भोसले यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. राज ठाकरे आणि अशा भोसले यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो सुद्धा समोर आला आहे. यामध्ये राज ठाकरेंच्या हातात विकिंग स्टिक दिसत आहे तर त्यांच्या शेजारी अशा भोसले उभ्या आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी अशा भोसलेंच्या खांद्यावर हात ठेवला आहे तर अशा ताईंनीही दोन्ही हातांनी राज यांचा हात पडला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे आणि अशा ताई दोघंही कॅमेरा कडे पाहून हसताना दिसत आहेत. राज ठाकरे यांची शास्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना जास्तीत जास्त अराम करण्याचा सल्ला दिलाय आणि म्हणूनच राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अशा भोसले राज यांना भेटायला त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवास स्थानी गेल्या होत्या. त्याचबरोबर राज ठाकरे आणि मंगेशकर( thackeray and mangeshkar) परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. दोन्ही कुटुंबातील व्यक्ती नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात.

हे ही वाचा – Raj Thackeray : गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली झलक

राज ठाकरे मागील काही दिवसांपासून हीप बोन या आजाराने त्रस्त होते. आणि याच संदर्भातील माहिती राज यांनी पुण्यातील त्यांच्या अनेक सभेतून दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज यांच्यावर शास्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर २० जून रोजी मुंबईतील लीलावती(leelavti) रुग्णालयात राज थाकेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि त्या नंतर पाच दिवसांनी म्हणजेच २५ जून रोजी राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले. याच संदर्भांत माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली होती. ट्विटरच्या पोस्ट मध्ये राज ठाकरे म्हणाले, ”आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली! काही वेळेपूर्वीच रुग्णालयातून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो! असं राज ठाकरे पोस्ट मध्ये म्हणाले.

हे ही वाचा – तो काळ खूप सुंदर होता, अशा भोसलेंनी दिला लता दीदींच्या सुरेल आठवणींना…

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचीही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र ही भेट केवळ राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतली होती असं भाजप कडून स्पष्ट करण्यात आलं.