घरताज्या घडामोडीमोहित कंबोज पुराव्यांशिवाय बोलत नाहीत, आशिष शेलारांकडून कंबोजांची पाठराखण

मोहित कंबोज पुराव्यांशिवाय बोलत नाहीत, आशिष शेलारांकडून कंबोजांची पाठराखण

Subscribe

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना लवकरच भेटणार, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार का, असा प्रश्न राज्याच्या वर्तुळात निर्माण झाला आहे.

कंबोज यांनी केलेल्या विधानानंतर भाजपा नेत्यांनी देखील त्यांचं समर्थन केलं आहे. मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. कंबोज पुराव्याशिवाय बोलत नाहीत, असं म्हणत भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी कंबोज यांची पाठराखण केली. पुराव्यांच्या आधारेच कंबोज यांनी भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले आहेत. कोणाला तुरुंगात टाकण्याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळायला हवं, पण त्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी तेच केलं आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

मलिक आणि देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता कोण असणार?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु कंबोज यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच हे ट्विट केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन संबंधित बड्या नेत्याचा खुलासा करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या संबंधीत नेत्याच्या सिंचन घोटाळ्याची फाईल २०१९ साली बंद करण्यात आली होती, असे स्पष्ट संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या बेनामी कंपन्या, त्यांच्या गर्लफ्रेंडच्या नावावर असलेली संपत्ती, भ्रष्टाचाराची माहिती आपण देणार आहोत, असे कंबोज म्हणाले. या संदर्भात कंबोज यांनी आज तीन ट्विट केले आहेत.


हेही वाचा : फडणवीसांची राज्यातच नाही तर केंद्रात एन्ट्री, मोदींनी दिली मोठी जबाबदारी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -