संविधानाचा गाभा बदलण्याचा भाजप-संघाचा डाव – अशोक चव्हाण

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाचा मूळ गाभा बद्दलविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र डॉ बाबासाहेबांचे आचार आणि विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याची भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Ashok Chavan Jansangharsh Yatra_Amravati
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची अमरावती येथे सभा

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाचा मूळ गाभा बद्दलविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र डॉ बाबासाहेबांचे आचार आणि विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याची भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली आहे आणि त्याच भूमिकेवर काँग्रेसची वाटचाल सुरू राहणार असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी अमरावती येथे बोलताना व्यक्त केले. सध्या काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. ६२ व्या महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्याने आज अमरावतीच्या इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

हेही वाचा – भाजप हा देशाला जडलेला कॅन्सर – अशोक चव्हाण

काय म्हणाले चव्हाण?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरच काँग्रेस पक्ष वाटचाल करीत असल्याचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत. यापुढे ते म्हणाले की, आमच्या नेत्यांना पाहून घेण्याची भाषा बोलली जात आहे, लोकशाहीत मात्र असे कोणी कोणालाच पाहून घेत नसतं. जनताच अशा लोकांना पाहून घेते असे टोला खासदार चव्हाण यांनी विरोधकांना लगावला आहे. त्याचबरोबर नालासोपारा येथे सापडलेल्या घातक स्फोटक प्रकरणी अटक झालेल्यांचा संबंध थेट देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनांशी आहे, ज्यांच्यावर बंदी आणण्याची आवश्यकता आहे. भाजपची निवडणुकीची हि पूर्वतयारी असल्याचेही चव्हाण म्हणाले आहेत.


हेही वाचा – सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? : अशोक चव्हाण