घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, अतुल भातखळकरांचा इशारा

मुख्यमंत्र्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, अतुल भातखळकरांचा इशारा

Subscribe

राज्यातील १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत संजय राऊत, अनिल परब या शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आणि अपमान आहे. या दोघांच्या विधानांना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची संमती आहे किंवा नाही याबाबत विचारणा करणारे पत्रच भाजपकडून त्यांना पाठवण्यात आले आहे. २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अन्यथा त्यांची या दोघांनी केलेल्या वक्तव्यांना संमती आहे, असे गृहीत धरून संजय राऊत, परब यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही सर्वोच्च न्यायालयात अवमान केल्याची याचिका दाखल करू, असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्दबातल ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. यावरून आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाइट हाउसमध्ये त्यांचा अध्यक्ष असेल, असे ते सांगू शकतात, पण काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. राज्यात पुढील २५-३० वर्षे त्यांची सत्ता येणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यावर भातखळकरांनी यांनी सोमवारी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही, असे ट्विट केले आहे.


हेही वाचा : Union Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या एक दिवसाआधीच SBIने वाढवले FDच्या ठेवींवरील व्याज, जाणून घ्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -