पीएफआयची आणखी कोंडी; महाराष्ट्र ATS ने औरंगाबादमधून अध्यक्षालाच ठोकल्या बेड्या

pfi

देश विरोधी कारवायांच्या आरोपाखाली तपास यंत्रणा NIA आणि ED पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेच्या देशभरातील कार्यालयांवर छापेमारी केली. तसेच संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकला. तपास यंत्रणांनी पीएफआयची आता आणखी कोंडी केली आहे. महाराष्ट्र ATS ने औरंगाबादमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षालाच ठोकल्या बेड्या आहेत. शेख नासीर शेख साबेर उर्फ नदवी (वय -३७) (रा.बायजीपुरा, औरंगाबाद) असे या अध्यक्षाचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला 2 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. (Aurangabad pfi state president arrested police custody till 2 October)

पीएफआय संघटनेच्या शेख इरफान शेख सलीम उर्फ मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजलं सय्यद खालील, परवेज खान मुजमिल खान, अब्दुल हादी, अब्दुल रौफ अशा चार जणांनादहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती,मात्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संघटनेचा अध्यक्ष शेख नासीर शेख साबेर उर्फ नदवी याची पथकाकडून चौकशी सुरु होती. अखेर चौकशीनंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. शेख विरोधात देशविरोधी कारवायांसाठी कट रचल्याचा आरोप आहे.

आरोपीला ए.टी.एसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलाने संशयिताचा टेरर फंडिंग प्रकरणात हात आहे का? याची सखोल चौकशी केली जाईल. त्याचबरोबर त्याची बँक खाती तपासणे, तो कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता? या संपूर्ण घटनांची चौकशी करण्यासाठी सरकारी वकिलांनी कोठडीची विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपी शेखला नऊ दिवसांची कोठडी सुनावली आहे.


PFI कारवाईचे पुण्यात पडसाद; आंदोलकांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा