घरमनोरंजनऔरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्युबर बिंदास काव्या अखेर मध्यप्रदेशमध्ये सापडली

औरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्युबर बिंदास काव्या अखेर मध्यप्रदेशमध्ये सापडली

Subscribe

औरंगाबादमधील प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर बिंदास्त काव्याचा अखेर शोध लागला आहे. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेली काव्या अखेर मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली आहे. काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने औरंगाबादमधील छावणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. अखेर आज मनमाडहून इटारसीला जात असताना ती रेल्वे पोलिसांनी सापडली आहे. तिच्या सोबत कोण होतं याची माहिती अद्याप समोर आली नसून ती भोपाळच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. या अल्पवयीन यूट्यूबर मुलीचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबस्क्रायबर आहेत.

बिंदास काव्याच्या आईने सोशल मीडियावर तिला परत येण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. काव्याच्या अचानक गायब होण्याने सोशल मीडियावर एकचं खळबळ उडाली होती. मात्र ती सापडल्याने आता तिच्या कुटुंबियांसह चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बिंदास काव्याला सोशल मीडियावरील एक इनफ्लूयन्सर म्हणून ओळखले जाते. काव्या 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता रागाच्या भरात घराबाहेर निघून गेली, यानंतर ती परतलीच नाही. संध्याकाळ उजाडला तरी ती परत न आल्याने कुटुंबिय घाबरून गेले होते. दरम्यान तिचा मोबाईलही बंद येत होता. ज्यामुळे कुटुंबिय अधिकच चिंतेत होते. यानंतर तिच्या कुटुंबियांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत काव्या अल्पवयीन असल्याचे म्हणत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अखेर आज ती सापडली आहे.

- Advertisement -

औरंगाबादच्या पडेगावत आई वडिलांसह राहणारी काव्या मागील वर्षभरात युट्युबवर प्रसिद्धीच्या झोतात आली. युट्यूबवर तिच्या व्हिडिओंना जवळपास 5 ते 45 मिनिलन व्ह्यूज मिळतात. साडेचार मिलियन सबस्क्राईब असलेली काव्या वडिलांसोबतच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली. युट्यूब व्यतिरिक्त ती इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रसिद्ध आहे.

बिंदास काव्याचे खरे नाव काव्यश्री यादव असे आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये 30 मार्च 2004 रोजी तिचा झाला. वयाच्या 15 व्या वर्षी तिला लोकप्रियता मिळाली. काव्याला व्हिडीओंसाठी तिचे आई-वडिल फार सपोर्ट करतात. काव्याचे Bindas Kavya नावाने यूट्यूब चॅनेल असून त्यावर ती व्लॉग अपलोड करत असते. नोव्हेंबर 2017 मध्ये हे चॅनल तिने सुरू केले होते. काव्याने कमी वयात youtube वर यशस्वी भरारी घेतली आहे.


अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -