घरमनोरंजनइथे पण नाटकं...पतीसोबत पूजा करत असलेल्या अंकिता लोखंडेला पाहून नेटकरी संतापले

इथे पण नाटकं…पतीसोबत पूजा करत असलेल्या अंकिता लोखंडेला पाहून नेटकरी संतापले

Subscribe

सध्या अंकिताने असाच एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला जो सध्या चर्चेत आला असून लोक या व्हिडीओमुळे अंकिताला ट्रोल करू लागले आहेत.

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार तिचे नवनवीन फोटो आणि विविध व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर देखील करत असते. दरम्यान, सध्या अंकिताने असाच एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला जो सध्या चर्चेत आला असून लोक या व्हिडीओमुळे अंकिताला ट्रोल करू लागले आहेत.

अंकिताच्या व्हिडीओवर नेटकरी संतापले
मागील एक दोन दिवसांपूर्वी अंकिताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि तिचा पती विक्की हिंदू धार्मिक पद्धतीने पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अंकिताने लाल रंगाची साडी नेसली आहे. तर तिच्या पतीने देखील यामध्ये पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. मात्र, अंकिता या व्हिडीमध्ये असं काही करताना दिसत आहे. जे पाहिल्यावर नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत. खरंतर, अंकिता या व्हिडीओमध्ये पूजा करत असताना नाचताना देखील दिसत आहे शिवाय पूजेच्या मध्ये मध्ये कॅमेरासाठी पोज देताना देखील दिसत आहे.

- Advertisement -

अंकिताच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करून ट्रोल करू लागले आहेत. त्यांपैकी एकाने लिहिलंय की, “देवाचा तरी मान राख, इथे पण नाटकं.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “पूजेमध्ये पण नाच चालू आहे.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करणं गरजेचं आहे का?” मात्र, याचं व्हिडीओवर कमेंट्स करत काहीजणांनी अंकिता आणि तिच्या पतीचे कौतुक देखील केलं आहे.


हेही वाचा :

‘थँक गॉड’ मध्ये अजय देवगण साकारणार चित्रगुप्ताची भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -