Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र WhatsApp Group ची कमाल! तयार केले ५० बेड्ससह २४ तास अ‍ॅम्ब्युलन्स...

WhatsApp Group ची कमाल! तयार केले ५० बेड्ससह २४ तास अ‍ॅम्ब्युलन्स सुविधेचे रुग्णालय

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा दुसऱ्या लाटेने देशातील आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून पडली आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शनअभावी रुग्ण दगावत असल्याचा ह्रदयद्रावी घटना समोर येत आहे. परंतु महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कोरोना योद्धे अर्थात डॉक्टरांनी जे कार्य केले आहे ते मानवतेचे प्रतिक उंचावणारे ठरत आहे. या डॉक्टरांनी WhatsApp Group च्या माध्यमातून एकत्र येत तब्बल ५० बेड्सचे हॉस्पीटल उभे करत कोरोना काळात समाजात नवा आदर्श तयार केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगांव या छोट्याशा गावातील शिक्षण, डॉक्टर, वकील, पत्रकार, राजकीय नेते, पोलीस, व्यापारी अशा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा ‘आवाज नायगावंचा’ असा एका WhatsApp Group आहे. या ग्रुपच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील नायगावमधील कोरोनासंदर्भात अपडेट आणि इतर घटना घडामोडी शेअर केल्या जात होत्या. दरम्यान नांदेड जिल्हा आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला असून दररोज हजारो नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यात जिल्ह्यात मृतांचा आकडाही दिवसागणिक वाढत असल्याने नांदेडकर चिंतेत आहे. अशातच ‘आवाज नायगावंचा’ या WhatsApp Group ने कमाल करत कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष  धावून गेले आहेत.  हेरवी WhatsApp Group हे फक्त वायफळ बडबड आणि गप्पा गोष्टी करण्यासाठी असतात असे नेहमी बोलले जाते होते. मात्र नांदेडच्या ‘आवाज नायगावंचा’ या WhatsApp Group ने सर्व गोष्टी खोट्या ठरवत व्हॉटसअपच्या माध्यामातून क्राउड फंडिंंग करत कोरोना रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने मदतीसाठी एक हात पुढे केला आहे.

- Advertisement -

कोरोना रुग्णांसाठी काही तरी भरीव काम केले पाहिजे अशी आयडिया ग्रुपचे अॅडमिन नागेश कल्याण यांचा डोक्यात आली. कोरोना रुग्णांसाठी गावातच एक छोटे रुग्णालय का नाही उभारता येणार असा विचार त्यांनी केला आणि हाच विचार त्यांनी कृतीत बदल यासंदर्भातील प्रस्ताव ‘आवाज नायगावंचा’ या WhatsApp Group वर शेअर केला. यावेळी नागेश यांना पुर्ण विश्वास होता की, WhatsApp Group मधील सदस्यांना हा प्रस्ताव नक्की आवडेल आणि ते यासाठी भरभरून मदत करतील आणि नेमके तसेच झाले.

 

- Advertisement -

या प्रस्तावावर ‘आवाज नायगावंचा’ ग्रुपमधील डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना निशुल्क सेवा देण्याची मदत केली. तर अनेकांनी पैशांची तर अनेकांनी औषधांची मदत केली. पाहता पाहता गावाबाहेर या कोव्हिड सेंटर उभारणीची चर्चा झाली आणि अनेक मदतीचे हात पुढे आले. यात मुख्य कोव्हिड सेंटर उभारणासाठी जागेचा प्रश्न होता. यावेळी नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आपली भव्य शाळा तात्पुरते कोव्हिड सेंटर बनवण्यासाठी दिली.

यावेळी ग्रुपमधील सर्व सदस्यांनी नांदेड जिल्ह्याचे कलेक्टरांची भेट घेत कोव्हिड सेंटर उभारणीसाठी अधिकृत परवानगी मिळवत उद्धाटनही केले. WhatsApp Group च्य़ा माध्य़मातून कोरोना रुग्णांसाठी तयार झालेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये सध्या ५० बेड्स उपलब्ध आहेत. तसेच अत्यावश्यक औषधांसह या सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि अति गंभीर रुग्णांना ने- आण करण्यासाठी २४ तास अॅम्ब्युलन्सची सुविधा आहे.यात कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा जेवणाची जबाबदारी स्वत: नगर पंचायतीच्या उपाध्यक्षांनी घेतली आहे. यात रुग्णांना सकाळचा नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवण, दोन वेळा गरम चहा दिली जात आहे. सध्या या कोव्हिड सेंटरमध्ये २० कोरोनाबाधित रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोरोनावर उपचार घेत आहे. त्यामुळे एका WhatsApp Group काय कमाल करु शकतो हे आवाज नायगावचा या ग्रुपने करुन दाखवले आहे.


 

- Advertisement -