…म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘कारण’

एक खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो शक्य आहे का हो, या सगळ्या अनेक गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. ही महाराष्ट्राची ताकद हकनाक तिथे सापडली असती. जात नाही म्हटल्यानंतर शिव्या खायला तयार आहे. टीका सहन करायला तयार आहे. पण पोरं अडकू देणार नाही, असंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

पुणेः अयोध्येला येऊ देणार नसल्याचं सांगितलं गेलं, विरोध केला. मला मुंबईतून, दिल्लीतून माहिती मिळत होती. मला उत्तर प्रदेशातूनही काही लोक सांगत होते. मला असं लक्षात आलं की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. हा पुन्हा विषय बाहेर काढा, असं सांगितलं गेलं, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. पुण्यात गणेश कला क्रीडा मंचावर राज ठाकरे बोलत होते.

सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला

परवा दिवशी मी चार ओळी टाकल्या, अयोध्या दौरा तूर्तास रद्द, अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झालं, काही जण कुत्सितपणे बोलू लागले म्हणून दोन दिवसांचा बफर दिला होता. मग मी माझी भूमिका महाराष्ट्राला आणि देशाला सांगेन, ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली, त्यानंतर अयोध्येला जाणारही तारीख जाहीर केली, असंही ते म्हणालेत. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती, असे अनेक जण होते. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी अयोध्येला जाणार जो विचार माझ्या मनात होता. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हा विषय आला, पण त्यावेळी आताचे अनेक जण जन्मालाही आलेले नसतील. ज्यावेळी कारसेवक अयोध्येला गेले होते, त्यावेळी सर्व कारसेवक ठार मारलं होतं, आणि सर्व कारसेवकांना प्रेतं शरयू नदीत तरंगत होती. जिथे माझे कारसेवक गेलेत, त्याचंही दर्शन घडलं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

हा सगळा ट्रॅप,…तर महाराष्ट्राची ताकद हकनाक तिथे सापडली असती

ते पुढे म्हणाले, तिथं जर काही झालं असतं तर तिथे तुम्ही त्यांच्या अंगावर गेलाच असताच, तुमच्यावर केसेस टाकल्या असत्या, तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं. आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी हे मी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंशी बोललो. ऐन निवडणुकीवेळी या सगळ्या गोष्टी लावल्या असत्या आणि तेव्हा निवडणुकीवेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो शक्य आहे का हो, या सगळ्या अनेक गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. ही महाराष्ट्राची ताकद हकनाक तिथे सापडली असती. जात नाही म्हटल्यानंतर शिव्या खायला तयार आहे. टीका सहन करायला तयार आहे. पण पोरं अडकू देणार नाही, असंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

राज ठाकरेंनी माफी मागावी तेव्हा आठवलं नाही का?

12 ते 14 वर्षांनंतर आठवण झाली, राज ठाकरेंनी मागितली तरच अयोध्येला पाऊल ठेवू देऊ, यातून चुकीचे पायंडे पडतायत. विषय माफी मागण्याचाच आहे ना, गुजरातचा अल्पेश ठाकूर नावाचा मुलगा आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारच्या लोकांकडून बलात्कार झाला होता. तेव्हा रातोरात यूपी-बिहारच्या लोकांना हाकलवून लावलं गेलं, गुजरातमधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ते मुंबईत आले आणि मग उत्तर प्रदेशमध्ये गेले. तिथे कुणाला माफी मागायला लावणार आहात? हे आता कसं काय सुरु झालं अचानक? हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.


हेही वाचाः राज सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरेंचं फेसबुक लाईव्ह, MNS पार्ट टाईम कार्यकर्त्यांविरोधात नाराजी व्यक्त