घरमहाराष्ट्रबावनकुळे आक्रमक, आव्हाडांनी ते ट्विट केलं डिलीट; नेमकं प्रकरण काय?

बावनकुळे आक्रमक, आव्हाडांनी ते ट्विट केलं डिलीट; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

Jitendra Awhad and Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना ट्वीट डिलिट करण्याची नामुश्की ओढावली आहे.

Jitendra Awhad and Chandrashekhar Bawankule | मुंबई – राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही फायरब्रॅण्ड नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड भाजपाच्या निशाण्यावर आहेत. त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना ट्वीट डिलिट करण्याची नामुश्की ओढावली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. चंद्रशेखर बावनकुळे औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहत आहेत, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी याद्वारे केला. या फोटोमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर नेते व मुस्लीम धर्मगुरू दिसत आहेत. हा फोटो ट्वीट करताच भाजपाच्या गटात खळबळ माजली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका होऊ लागली. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लागलीच या फोटोबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

“औरंगजेबजी यांच्या कबरीवर मी जाऊन दर्शन घेतलं अशी एक पोस्ट आज जितेंद्र आव्हाडांनी केली. जे. पी. नड्डा, मी चंद्रपूरमध्ये पवित्र दर्ग्यावर गेलो. तिथल्या मुस्लीम परिवारांनीही आमच्यासह दर्शन घेतलं. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय ट्वीट केलं? ते भूगोल विसरलेत का? ते म्हणतात औरंगजेबाच्या थडग्याचं दर्शन घेतलं. इतका नीचपणा?” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देताच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं ट्वीट डिलिट केलं. त्यांनी ट्वीट डिलिट करताच भाजपा महाराष्ट्र या अधिकृत ट्वीटर हँण्डवरून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधण्यात आला. “जितेंद्र आव्हाड ट्विट डिलिट करण्याची वेळ आली नसती. जर ट्विट करण्याआधी विचार केला असता. आव्हाड, मध्यरात्री ट्विट करणारे नशेत असतात. आव्हाड माफी मागा केलेल्या विकृत प्रकाराबद्दल! आव्हाड, महाराष्ट्रतील जनतेलाही सांगा, तुमचं आणि औरंग्याचं नातं काय?”, असं ट्वीट भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -