घरमहाराष्ट्रलव्हर्स पॉईंटवर शुकशुकाट प्रेमीयुगुलांनी घेतला करोनाचा धसका

लव्हर्स पॉईंटवर शुकशुकाट प्रेमीयुगुलांनी घेतला करोनाचा धसका

Subscribe

=गुलाब विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी, =दररोज 500 रुपयांचे नुकसान

‘प्यार करने वाले कभी डरते नही’,‘जो डरते हैं ओ प्यार करते नही’….‘हिरो’ चित्रपटाचे हे गाणे तरूणवर्गामध्ये खुप प्रसिध्द आहे. मात्र आज प्रेमकरणार्‍या प्रेमीयुगलानी करोना व्हायरसचा जणू काही धसका घेतला आहे. मुंबईतील लव्ह पॉईट असलेल्या स्थळावर मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगल भेट देत असतात.

मात्र या करोना व्हायरसमुळे प्रेमीयुगलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. इतेकच नव्हेतर मुंबईतील जूहू चौपाटीसह मरीन लाईन्सवर शुकशुकाट दिसून येत आहे. त्यांचा परिणाम गुलाब विक्रेत्यांवर पडला आहे. दररोज 500 पेक्षा जास्त रुपयांचेनुकसान होत आहे. एकीकडे बरोजगारी आणि दुसरी कडे करोना व्हायरस यांच्या भितीमुळे आज उपाशी मरण्याची पाळी आली आहेत.जगभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहेत.

- Advertisement -

देशासह महाराष्ट्रात करोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे सुरक्षेचा दुष्टीने सिनेमागृह,शाळा कालेज आणि शहरातील मॉल्स सरकारने बंंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातच करोना व्हायरसचा मुंबईतील प्रेमयुगलांवर मोठ्या धसका घेतला आहे.मोठ्या प्रमाणात मरीन लाईन्स,गिरगांव चौपाटी आणि जूहू चौपाटी प्रेमीयुगल भेट देत असतात. मात्र शनिवार आणि रविवारी करोना व्हायरसमुळे संख्या फार कमी होती. इतकेच नव्हेतर कुटूबांसोबर फेरफटका मारणार्‍या नागरिकांची सुध्दा गर्दी कमी दिसून येत होती. मात्र सोमवारी मरीन लाईन्स,गिरगांव चौपाटी आणि जूहू चौपाटी शुकशुकाट दिसून आला आहे. त्यामुळे यापरिसरातील छोटया मोठया व्यवस्यावर सुध्दा वाईट परिनाम पडला आहे.

याती सर्वां मोठा फटका गुलाब व्रिकेतांवर पडला आहे.त्यांच्या व्यवस्यात 60 टक्यांची घटन झाली आहे. प्रत्येक दिवशी 50 पेक्षा जास्त गुलाब विकणारे आज मात्र फक्त 5 गुलाब विकत आहे. त्यामुळे बाजारातून आनलेल्या गुलाब फुले आज सडत असल्याची माहिती मरीन लाईन्सवरील गुलाब फुल विक्रेता पारू संजय पवार यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.दररोज पाच बडल गुलाब फुलाची विक्री करत होते. मात्र आज एक बडल सुध्दा विकल्या जात नाही. बाजार मुल्यानूसार 100 रुपयांचा गुलाब फुलाचा एक बडल होतो.ज्यात 20 गुलाब असतात. प्रति गुलाब 15 रुपये या किंमती ते विकत होते. मात्र करोना व्हायरसमुळे लव्ह पॉईटवर प्रेमीयुगलांची संख्या कमी झाल्याने आज मोठया प्रमाणात नूकसान होत आहे. अशीच परिस्थिती गजरा विकणार्‍यांची सुध्दा आहेत.

- Advertisement -

प्यार से नही करोना से डर लगता है साहब
करोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे सरकार दिलेल्या आदेशांचे पालन करने गरजेचे आहे.कारण एकामेकांची काळजी घेने हेच खर प्रेम आहे. त्यामुळे करोना व्हायरस पसरु नयेत,यासाठी आपन सर्वांनी गर्दीचा ठिकांनी जाने टाळावेत.करान प्यार से नही करोना से डर लगाता है साहब अशी प्रतिक्रिया एका प्रेमीयुगलांनी दैनिक आपलं महानगरशी बोलत दिली आहे.

सहा दिवसापुर्वीं आमचा व्यवसाय सुरळीत सुरु होता. दररोज 300 ते 400 रुपये कमाई करायचो.मात्र जेव्हापासून करोना व्हायरस मुंबईत शिरला. तेव्हापासून प्रेमीयुगलांची संख्या कमी झाली. त्यामुळे आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. विकत आनलेले गुलाबांचे फुलांची विक्री होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे काही दिवस फुल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
-शुभांगी पवार, गुलाब फुल व्रिकेती,

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -