घरमहाराष्ट्रसीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

Subscribe

करोनामुळे वैद्यकीय प्रवेशाची कागदपत्रे पडताळणी रद्द

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. वैद्यकीय व दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे कॉलेजमध्ये प्रवेश घेताना सादर करण्यात याव्यात अशा सूचना सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. सीईटी सेलच्या या निर्णयामुळे करोनाच्या वाढत्या भीतीदायक वातावरणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

करोना विषाणूमुळे सध्या राज्यामध्ये भितीदायक वातावरण पसरले असताना सीईटी सेलकडून शनिवारी व रविवारी राज्यभरात एमबीएची प्रवेश प्रक्रियेची परीक्षा यशस्वीरित्या घेतली. 17 ते 22 मार्चदरम्यान वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करायचे होते. कागदपत्रे पडताळणीसाठी राज्यभरातील एआरटी केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता आहे. राज्यातील करोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता एआरटी केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सीईटी सेलकडून अर्ज पडताळणीची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येते. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नवे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली.

नव्या वेळापत्रकानुसार नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी 16 मार्चला सायंकाळी 6 वाजता जाहीर करण्यात आली. त्यानंतर 18 ते 23 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय अर्जामध्ये बदल करता येणार आहे. 23 मार्चला सायंकाळी 6 वाजता जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 24 ते 30 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर पहिली मेरिट लिस्ट 4 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार असून, 5 ते 12 एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करताना एखाद्या विद्यार्थ्यांला आवश्यक कागदपत्रे सादर करता आली नाहीत. तर तो बाद ठरणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -