खुशखबर! प्रवाशांसाठी विमानतळावरून आता २४ तास बेस्ट बस सेवा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज अनेक प्रवासी करत असतात. या प्रवाशांना रात्रीच्या सुमारास विमानतळ ते आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि खासगी गाड्यांनी प्रवास करतात.

best

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज अनेक प्रवासी करत असतात. या प्रवाशांना रात्रीच्या सुमारास विमानतळ ते आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि खासगी गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना अधिक पैसे खर्च करावे लागतात. मात्र आता या प्रवाशांना बेस्टच्या माध्यमातून कमी दरात प्रवास करता येणार आहे. बेस्टच्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

विमान प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस चालवल्या जातात. परंतु रात्री १२ वाजल्यानंतर प्रवासी व विमानतळावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहचण्यास वाहतुकीची मर्यादित साधने उपलब्ध असतात. म्हणूनच प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता बेस्ट उपक्रमामार्फत मोठा निर्णय घेण्यात आला असून, आता विमानतळावरील बससेवा २४ तास सुरू राहणार आहे.

बससेवा २४ तास सुरू

  • आंतरराष्ट्रीय विमानतळ १ ते बॅकबे – १७५ रुपये
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ २ ते वाशी – १५० रुपये
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ ४ ते ठाणे – १५० रुपये

बेस्ट उपक्रम रात्री उशिरा जरी सेवा देणार असेल तरीही प्रवासभाडे सर्वसाधारण आकारण्यात येणार आहे. तसेच ‘हात दाखवा बस थांबवा’ या योजनेचा लाभ घेत प्रवासी बस थांबवू शकतात. अहोरात्र चालणा-या बससेवेचा लाभ अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.


हेही वाचा – शिवसेना-मनसेमध्ये व्हिडीओ वॉर; बाळासाहेबांचा तो व्हिडीओ शेअर करत सेनेचा मनसेला टोला