घरताज्या घडामोडीबेस्टची हरित क्रांती, भविष्यात ७०० मेगावॅट हरित उर्जेचा वापर करणार

बेस्टची हरित क्रांती, भविष्यात ७०० मेगावॅट हरित उर्जेचा वापर करणार

Subscribe

कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाची वाटचाल डिजिटलच्या दिशेने व आता हरित क्रांतीच्या दिशेने होत आहे. बेस्ट उपक्रम भविष्यात ७०० मेगावॅट ‘हरित ऊर्जेचा’ वापर करणार आहे. तसेच, जर बेस्टच्या दहा लाख वीज ग्राहकांची काही कारणास्तव बत्ती गुल झाल्यास ती कधी येणार, त्याला किती वेळ अंधारात बसावे लागणार याबाबत आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण की, बेस्ट स्वतः त्याबाबतची माहिती मेसेजद्वारे ग्राहकांना कळविणार आहे.यासंदर्भातील माहिती, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात मंगळवारी आयोजित केलेला ‘बिजली महोत्सव’ पार पडला.
याप्रसंगी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, एनटीपीसीचे क्षेत्रीय कार्यकारी निदेशक मनीष जोहरी,अदानी कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कपिल शर्मा आणि बेस्टचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

बेस्ट उपक्रम सध्या कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असला तरी बेस्टचा वीज विभाग शहर भागातील आपल्या १० लाख वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करीत आहे. या १० लाख वीज ग्राहकांमध्ये ८ लाख निवासी व २ लाख व्यावसायिक वीज ग्राहक आहेत. मात्र बेस्ट उपक्रम कितीही आर्थिक अडचणीत असला तरी या सर्व वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करते. यामध्ये, मुंबई महापालिका मुख्यालय, शहर भागातील कार्यालये, मोठमोठ्या कंपन्यांचे मुंबईतील हेडऑफिस, मंत्रालय, विधान भवन , राजकीय पक्ष कार्यालये आदींचा या वीज ग्राहकांत समावेश आहे.

भविष्यात ७०० मेगावॅट हरित ऊर्जेचा वापर

- Advertisement -

बेस्ट उपक्रम एकाबाजूला बेस्ट परिवहन विभागाच्या बस प्रवाशांना डिजिटल सेवा, विविध सुविधा पुरवून सुखकर अगदी मिनी इलेक्ट्रिक बसगाड्यांमधून गारेगार प्रवास घडवत आहे. तर दुसरीकडे, बेस्टचा वीज विभाग आता हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बेस्ट वीज विभाग, भविष्यात ७०० मेगावॅट हरित ऊर्जेचा वापर करणार आहे. त्याचप्रमाणे, जर काही कारणास्तव बेस्टचा वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज ग्राहक काहीसे टेन्शनमध्ये येतात. वीजपुरवठा का खंडित झाला, कधी वीज येणार, किती वेळ लागणार असे प्रश्न वीज ग्राहकांसमोर उभे राहतात. मात्र आता जर बेस्टचा वीज पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास त्याबाबत ग्राहकांना बेस्टकडून तात्काळ मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे. तसेच, वीज पुरवठा पूर्ववत होण्याबाबतही माहिती मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे.


हेही वाचा : कोणतेही वादळ आले तरी कांदळवनासारखे सरकार मजबूत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -