घरताज्या घडामोडीNational Common Mobility Card : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बेस्टकडून नॅशनल कॉमन मोबिलीटी...

National Common Mobility Card : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बेस्टकडून नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड जारी

Subscribe

मुंबईतील विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने त्यांची नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड पूरक पद्धती चाचणी तत्वावर सुरू केली आहे. या सर्वाजनिक चाचणी अंतर्गत बेस्ट उपक्रमाकडून को-ब्रँडेड नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड देण्यात येणार आहे. प्रवाशांकडे असलेली नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड देखील त्यांनी बेस्ट उपक्रमाची तिकिटे खरेदी करण्याकरिता वापरता येणे शक्य होणार आहे.

भारतामधील अग्रगण्य असलेल्या परिवहन तंत्रज्ञान कंपनी चलो यांच्यासह येस बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे प्रमुख उत्पादन असलेले रू-पे यांच्यासह भागीदारीमध्ये असलेली बेस्ट को-ब्रँडेड नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड जारी करण्यात आली आहे. त्यामुळे टॅप-टु-पे प्रिप्रेड कार्ड बसगाड्यांवर आणि मेट्रो, रेल्वे, दुकाने, रेस्टॉरंट आणि ऑनलाईन यांसारख्या ज्या ठिकाणी नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड आणि रू-पे कार्ड स्वीकारण्यात येतात, अशा ठिकाणी वापरण्यात येणार आहेत.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये आणि ज्या ठिकाणी नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्डची अंमलबजावणी करण्यात आली आहे.  मेट्रो, रेल्वे यांसारख्या ठिकाणी आणि भारताच्या अन्य वाहतूक व्यवस्थेमध्ये त्वरीत संपर्करहित प्रदानाकरिता सदर कार्डाचा वापर करता येऊ शकतो. भारतामधील २० लाखांपेक्षा अधिक रू-पे टर्मिनसच्या ठिकाणी या कार्डाचा वापर करता येऊ शकतो. ई-कॉमर्स संकेतस्थळ, ट्रॅव्हल पोर्टल आणि ऑनलाईन स्वरूपातील कोणतंही कार्ड प्रदान करण्यासाठी कार्डाचा वापर केला जाऊ शकतो.

सर्व बेस्ट बसगाड्यांमध्ये बसवाहकाकडून सदर कार्ड त्वरीत रीचार्ज करता येईल आणि सदर कार्डावरची शिल्लक रक्कम तशीच राहील. याबाबतीत ऑनलाईन रिचार्ज पद्धती अल्पावधीतच सुरू करण्यात येणार आहे. कार्डामधून टॅप-टु-पे ही सुविधा देण्यात येत असून ज्या ठिकाणी संपर्करहित प्रदानं स्वीकारण्यात येत नाहीत अशा ठिकाणी देखील इ.एम.व्ही चिप किंवा मॅग्नेस्ट्रिक स्ट्रीप प्रदानकरिता सदर कार्डाचा वापर करता येऊ शकतो. या कार्डची किंमत सुरूवातीला १५० ऐवजी १०० रूपयेमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच निवडक बस आगार आणि येस बँकेच्या निवडक शाखांमध्ये हे कार्ड उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ठाण्यातील उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून कंटेनर उलटला; रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -