Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे अभिनेत्री भाग्यश्री मोटेंच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

अभिनेत्री भाग्यश्री मोटेंच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

 

पुणेः मराठी मालिका अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांची बहिण मधू मार्कण्डेय यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. मधू यांच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे मधू यांच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री मोटे व त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

मधू या पुण्यातील वाकड परिसरात केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. त्या भाड्याने राहण्यासाठी जागा शोधत होत्या. रविवारी त्या भाड्याने जागा बघिण्यासाठी गेल्या होत्या. मधू यांच्यासोबत त्यांची मैत्रिण होती. त्यावेळी त्यांना अचानक भुवळ आली. त्यांची दातखिळी बसली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे योग्य ते उपचार झाले नाहीत. त्यामुळे मधू यांना यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना तपासणी केल्यावर मृत घोषित करण्यात आले.

मधू यांच्या चेहऱ्यावर जखमा आढळल्या. परिणामी मधू यांच्या हत्येचा संशय बळावला आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही मधू यांच्या हत्येचा संशय आहे. पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र भाग्यश्री मोटे आणि त्यांची बहिण मधू यांचे जवळचे नाते होते. मधू यांच्यासोबतचे विविध फोटो भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी शेअर करायची. मधू यांच्या अचानक जाण्याने भाग्यश्री निशब्द झाल्या आहेत. तू नाहीयेस? अशी पोस्ट भाग्यश्री यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. सोबत भाग्यश्री यांनी मधू यांचा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

भाग्यश्री मोटे यांनी देवयानी मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले होते. ही भूमिका त्यावेळी खूप गाजली होती. मधू यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत. पण या पोलीस तपासाची नेमकी दिशा अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

मधू यांच्या मामाचा मुलगा संतोष पोकळे यांनी सांगितले की, मधू कोणत्या मैत्रिणीसोबत गेली होती हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे तिच्या घातपाताचा आम्हाला संशय आहे. पंधरा दिवसांपूर्वी मधू यांच्या पतीचे निधन झाले. ती दोन मुलांसोबत राहत होती.

- Advertisment -