अयोध्येत राज ठाकरेंविरोधात पोस्टर्सबाजी, न येण्याची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. त्यानंतर राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली. मात्र राज ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध कायम ठेवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. त्यानंतर राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली. मात्र राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांच्याविरोधात अयोध्येत पोस्टरबाजी केली जात आहे. “राज ठाकरे परत जा”, या मथळ्याखाली पोस्टरबाजी अयोध्येत केली जात आहे. तसंच, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध कायम ठेवला आहे.

राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्याकडून केली जात आहे. तसंच, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचं सागत या अभियानाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

या पोस्टरमध्ये “उत्तर भारतीयोंको अपराधी कहने वाले राज ठाकरे माफी मांगो या फिर वापस जाओ”, असं लिहिण्यात आलं आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध कायम ठेवला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.

 

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून पोस्टर शेअर करत राज ठाकरे यांच्या विरोधातील भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंच्या विरोधासाठी चलो अयोध्या महाअभियान घोषित केलं आहे. तसंच, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांना अपमानित करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात माफी मागा अन्यथा माघारी जा या अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून मोठं समर्थन मिळत असल्याचा दावा केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून पोस्टर देखील शेअर केलं आहे.


हेही वाचा – सोमय्यांनी मनसुख हिरेन कुटुंबीयांची घेतली भेट; आता ‘एनआयए’ची भेट घेणार