Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपच्या गळाला; 'या' नेत्यानं केलं खळबळजनक वक्तव्य

राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपच्या गळाला; ‘या’ नेत्यानं केलं खळबळजनक वक्तव्य

Subscribe

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जयंत पाटील यांचं नाव आहे.

राज्यातील राजकीय वातावरण हे विविध मुद्द्यावरुन तापलेलं आहे. त्यातच त्यात आणखी भर टाकत राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याचं वक्तव्य राजकीय वर्तुळातून केलं गेलं आणि चर्चांना पुन्हा उधाण आलं. ( Big NCP leader will soon join BJP Prakash Ambedkar made a sensational statement )

राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष असल्याचं मोठं विधान करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जयंत पाटील यांचं नाव आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेटम जयंत पाटलांना दिला तर ते भाजपमध्ये जायला कधीही तयार होतील.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी नेहमी एकत्र असणार, हे विधान करुन जे गुमराह केलं जातं आहे, त्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या डावपेचांपासून साध राहा, असा सल्लादेखील प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

तसचं, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसंचं, महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवाचा सरकारला विसर; अजित पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र )

पटोलेंवर साधला निशाणा

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नाना पटोलेंवर टीकास्त्र चालवलं आहे. ते म्हणाले नाना पटोले सध्या एखाद्या इंग्रजी चित्रपटाप्रमाणे झालं आहे. हॉट अँड ब्लो. कधी गरम हवा तर कधी फुस. सध्या ईडीच्या कारवाईमध्ये दबाव कोणावर असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असही ते यावेळी म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बदला- काँग्रेस नेत्यांची मागणी 

काँग्रसे नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन नाना पटोलेंना हटवण्याची मागणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तसं पत्र त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहलं आहे.

- Advertisment -