Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कधी ना कधी गाव सोडून जावंच लागतं, शरद पवारांच्या टोल्यावर आलं भाजपच...

कधी ना कधी गाव सोडून जावंच लागतं, शरद पवारांच्या टोल्यावर आलं भाजपच उत्तर

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर भाजप आता आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप होताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गप्प का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शरद पवारांनीही (sharad Pawar) आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना टोला लगावत शरद पवार म्हणाले की, ज्यांना आपलं स्वतःच गाव सोडून राहण्यासाठी दुसऱ्या गावी जाव लागत अशा लोकांबद्दल मी बोलायच का असा सवाल शरद पवार यांनी केला आहे ? त्यावर आता भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे. सगळ्यांनाच कधी ना कधी गाव सोडून जावंच लागतं. चंद्रकात पाटील आपल्या गावातून जरी दुसऱ्या गावात आले असले तरीदेखील ते निवडून आले. ते राज्याचे नेते आहेत. त्यामुळे आमचे राज्याचे नेते कुठुनही निवडून येऊ शकतात हे महत्वाचे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिले आहे. ( Devendra Fadanvis replied on sharad pawar statement over chandrakant patil)

काय म्हणाले होते शरद पवार ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. शरद पवार गप्प का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर ज्यांना आपलं स्वतःच गाव सोडून राहण्यासाठी दुसऱ्या गावी जाव लागत अशा लोकांबद्दल मी बोलायच का ? असा टोला शरद पवारांनी लगावला. पुण्यात खयाल यज्ञ कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

गोगइंवरही शरद पवार म्हणाले…

- Advertisement -

भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या वक्तव्यावरदेखील शरद पवारांनी चिंता केली आहे. गोगई यांचे विधान हे धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे. हे विधान म्हणजे न्यायव्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर नाही ना याचाही विचार व्हावा. या विधानामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचे ते म्हणाले. आपली न्यायव्यवस्था किती उच्च आहे हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात न्यायाधीशांच्या बैठकीत म्हटले होते.

- Advertisement -