घरमहाराष्ट्रगावकऱ्यांना आपसात भिडवणे हा बारामतीचा पॅटर्न, भाजपाचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

गावकऱ्यांना आपसात भिडवणे हा बारामतीचा पॅटर्न, भाजपाचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई – बारामती तालुक्यातील जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्लेवाडी गावातून जातो. गावठाणात रस्ता रुंदीकरण १० मीटर व्हावा की सात मीटर व्हावा यावरून गावकऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत. या वादातूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोरच काल दोन गटांत वाद सुरू झाला. या वादात खुद्द सुप्रिया सुळे यांनी लक्ष घालत दोन्ही गटाची समजूत काढली. मात्र, यावरून भाजपाने आता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. रस्ता रुंदीकरण्याच्या वादावरून गावकऱ्यांना आपसात भिडवणे हा बारामती पॅटर्न आहे, अशी टीका भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलीय.

‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करत सुप्रिया सुळे यांनी आजपर्यंत बारामतीत राज्य केलं. रस्ता रुंदीकरण्याच्या वादावरून गावकऱ्यांना आपसात भिडवणे हा बारामती पॅटर्न आहे. बारामती शहराचा विकास म्हणजे मतदारसंघाचा विकास नाही. जनतेला पाण्यासाठी, रस्त्यासाठी आजही भांडावं लागत आहे, असे टीकात्मक ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटरवरून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

काय आहे वाद?

- Advertisement -

डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. दहा मीटर रुंदीकरणाचा या ठिकाणी प्रस्ताव असून येथे सात मीटरचा रस्ता बांधावा अशी मागणी काही ग्रामस्थांकडून करण्यात येतेय. त्यामुळे या रस्त्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. सुप्रिया सुळे आज या गावात दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यापर्यंत गेलं. याप्रकरणी चर्चा सुरू असतानाच दोन्ही गटांत वाद निर्माण होऊन गोंधळ झाला. अखेर सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांचे म्हणणे एकून घेत ग्रामस्थांची समजूत घातली. विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन सुळेंनी दिले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -