घरताज्या घडामोडीअभिनेत्रीला सुरक्षा देता मग युपीतल्या मुलींना सुरक्षा का नाही? नीलम गोऱ्हे यांचा...

अभिनेत्रीला सुरक्षा देता मग युपीतल्या मुलींना सुरक्षा का नाही? नीलम गोऱ्हे यांचा संतप्त सवाल

Subscribe

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपुर्ण देशातून आक्रोश व्यक्त आहे. या प्रकरणावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मध्यतंरी एका अभिनेत्रीने मागणी केल्यानंतर तिला तात्काळ सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी काढायला निघालेल्या लोकांना त्या राज्यातील मुलींना सुरक्षा पुरविता येत नाही, अशी घणाघाती टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांना एका महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी काढायला निघालेल्या लोकांना त्या राज्यातील महिलांना सुरक्षित ठेवता येत नाही. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने बेजबाबदारपणा कळस आणि अतिशय अयोग्य वर्तन केले असून हाथरसच्या घटनेमधून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षासंदर्भात उतर प्रदेशातील भीषण अवस्था समोर आलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये जे जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी.”

- Advertisement -

हाथरसमधील बलात्कार आरोपींना एका महिन्याच्या आत शिक्षा द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

"एका अभिनेत्रीला पटकन सुरक्षा पुरविली जाते, मात्र उत्तर प्रदेशमधील राज्यातील महिलांना सुरक्षा दिली जात नाही आणि चालले आहेत फिल्म सिटी बनवायला" – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, September 30, 2020

 

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

१४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार आरोपींनी अतिशय क्रूरपणे एका १९ वर्षीय दलित पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर तिला अमानुष मारहाण करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अरेरावी करत हा बलात्काराचा नाही तर छेडछाडीचा गुन्हा असल्याचे सांगितले. बलात्कारानंतर तब्बल १५ दिवासंनी या पीडित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावर कडी म्हणजे पोलिसांनी या मुलीचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन न करता परस्पर रात्रीच्या अंधारात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे देशात उत्तर प्रदेश सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -