मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे खरे कोण?, कोर्लईतील १९ बंगल्यांवरुन सोमय्यांचा पुन्हा घणाघात

bjp kirit somaiya ask Who is the real cm uddhav Uddhav Thackeray or Rashmi Thackeray in korlai bunglow
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे खरे कोण?, कोर्लईतील १९ बंगल्यांवरुन सोमय्यांचा पुन्हा घणाघात

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री कुटुंबीयांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सोमय्यांनी अलिबागमधील कोर्लई येथील बंगल्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करुन थेट असली कोण आणि नकली कोण? असा सवाल केला आहे. कधी म्हणतात कोर्लईमध्ये 19 बंगले अस्तित्वात होते तर कधी म्हणतात अस्तित्वात नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे आहेत? की, रश्मी ठाकरे खऱ्या आहेत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान किरीट सोमय्या 19 बंगल्यांवरुन मे महिन्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करत अलिबागमधील १९ बंगल्यांबाबतचे कागदपत्रे शेअर केले आहेत. तसेच त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “असली नकली, 2019 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात कोर्लई अलिबाग मध्ये 19 बंगलो अस्तित्वात होते तसेच आहे. तर 2021 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात 19 बंगलो अस्तित्वात नाही आणि नव्हते, खरे कोण ! खोटे कोण !, 2019 चा रश्मी ठाकरे असली की 2021 चा रश्मी ठाकरे असली,
असली कोण नकली कोण?” असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोर्लईतील 19 बंग्लांचा घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे 19 बंगले दाखवण्यात आले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. परंतु 2021 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात 19 बंगलो अस्तित्वात नाही. तर 2019 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात कोर्लई अलिबाग मध्ये 19 बंगलो अस्तित्वात होते असे बोलतात. त्यामुळे असली कोण आणि नकली कोण असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्रच्या जनतेला लुटण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार करत आहेत. लबाडी कोण करतंय, रश्मी वहिनी लबाडी करू शकत नाही. पण त्यांचे पती उद्धव ठाकरे लबाडी करू शकतात. मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीसाठी लबाडी कराताहेत असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या याचिका दाखल करणार

मे महिन्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. रश्मी उद्धव ठाकरे कोर्लई अलिबागचा 19 बंगलो घोटाळ्यावर आणि याचिकेच्या मसुद्यावर सोमय्यांनी अलिबाग दौऱ्यादरम्यान वकिलांशी चर्चा केली आहे. यानंतर ते कायदेशीर मार्गाने कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात, BMW कार आणि एसटीची जोरदार धडक