घरताज्या घडामोडी'हा भाजपा पुरस्कृत कार्यक्रम नाही'; राणा दाम्पत्य आणि शिवसेना वादावर भाजपा नेते...

‘हा भाजपा पुरस्कृत कार्यक्रम नाही’; राणा दाम्पत्य आणि शिवसेना वादावर भाजपा नेते अतुल भातखळकरांचे स्पष्टीकरण

Subscribe

हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात आता राणा दाम्पत्यांनी उडी घेतली आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानानंतर मातोश्री बाहेरील परिसराक जोरदार राडा रंगला आहे.

हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात आता राणा दाम्पत्यांनी उडी घेतली आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानानंतर मातोश्री बाहेरील परिसराक जोरदार राडा रंगला आहे. राणा दाम्पत्यांच्याच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे. मात्र हे भाजपा पुरस्कृत असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्यत्तर देत ‘हे काय भारतीय जनाता पार्टीने जाहीर केलेला कार्यक्रम नाही. त्यामुळं भाजपा पुरस्कृत हा कार्यक्रम नाही’, असं त्यांनी म्हटलं. शिवाय त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

”संजय राऊत तर काहीही बोलू शकतात, पाप केल्यामुळे कोरोना होतो हे सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. शिवाय कंपाउंडरकडना औषध घेतो असं म्हणणारे ते कंपाउंडरकडनाही औषध घेत नाहीत.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा याच्याशी काहीही संबंध नाही, असंही त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणं राज्याचे पोलीस काय करताहेत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित असून, या प्रश्नाचे उत्तर द्यावं असं म्हटलं.

- Advertisement -

राज्यपालांच्या भेटीसदर्भात ही भातखळकर यांनी भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, “आता आम्ही मुंबई शहराच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहोत. तसंच, राज्याच्या गृहमत्र्यांची वेळही मागत आहोत”, असं त्यांनी म्हटलं.

राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबत भाजपचे मुंबईचे सर्व आमदार व खासदार यांची शनिवार पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपा नेते आशिष शेलार, मोहित कंबोज, भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो, आमचे हात बांधले नाही, दरेकरांचा शिवसेनेला स्पष्ट इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -