घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी; चंद्रकांत पाटलांचा टोला

राष्ट्रवादी खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी; चंद्रकांत पाटलांचा टोला

Subscribe

भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला टोला लगावला. समाधान मानण्यावर असतं. काही लोक लिमलेटची गोळी मिळाली तरीही समाधानी होतात. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर बोलताना चंद्रंकांत पाटील म्हणाले, आज दुपारी २ वाजता खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. त्या प्रवेशालाच दोन तास लागले त्यामुळे आता पुढे काय होतं पाहू. नाथाभाऊंना पक्षाने पुष्कळ दिलंय. त्यांच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण ते काही भाजपमध्ये थांबले नाहीत. आता राष्ट्रवादी काय देतंय पाहू. तुमचं समाधान होईल असं आश्वासन मिळाल्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंटच्या घरुन बाहेर पडले आहेत. समाधान म्हणजे लिमलेटची गोळीही असते आणि कॅडबरीही. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार ते पाहणं महत्त्वाचं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना प्रश्न विचारला. जे काही मिळेल त्याने नाथाभाऊ समाधानी होतील का? की काही पर्यायच उरलेला नाही म्हणून जे मिळेल ते गप्प स्वीकारतील? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना विचारला आहे. भाजपमध्ये होणारे निर्णय सामूहिक निर्णय असतात. एकट्या देवेंद्र फडणवीस यांना खडसेंनी दोष देणं योग्य नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.


हेही वाचा – अन् क्वारंटाईन असलेल्या अजित पवारांनीही लावली खडसेंच्या पक्षप्रवेशाला उपस्थिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -