घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या अपमानावरुन उद्धव ठाकरे संतप्त; म्हणाले, हिंदूह्रदयसम्राटांचे महत्त्व कमी करण्याची भाजपची चाल

बाळासाहेबांच्या अपमानावरुन उद्धव ठाकरे संतप्त; म्हणाले, हिंदूह्रदयसम्राटांचे महत्त्व कमी करण्याची भाजपची चाल

Subscribe

हळूहळू बाळासाहेबांचे महत्व कमी करण्याची भाजपाची चाल आहे. ज्यांच्याकडे काही काम नाही, त्यांना चोरी करायची गरज भासते. यांच्याकडे एकही असा नेता नाही ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला होता. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे.

हळूहळू बाळासाहेबांचे महत्व कमी करण्याची भाजपाची चाल आहे. ज्यांच्याकडे काही काम नाही, त्यांना चोरी करायची गरज भासते. यांच्याकडे एकही असा नेता नाही ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला होता. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. (is a ploy by BJP to reduce the importance of Balasaheb thackeray says Uddhav Thackeray vvp96)

“चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजप कडे कधीच शौर्य नव्हते”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत त्यावर आडवाणींची मुलाखतीचा संदर्भ. मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला”, असेही हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.

“बाळासाहेबांचे शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये. बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत?त्यांच्या कडून येऊ द्या भाजपच्या कार्यालयात सराव सुरु असेल”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“बाबरी पाडल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेवर नव्हती जी मुंबई वाचवली ती शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी बहाद्दर शिवसैनिकांनी वाचवली गुजरात अहमदाबादमध्ये जे घडले ते पोलिसांकडनं त्याच्यात बराचसा पोलिसांचा वापर केला गेला आमच्या हातात पोलीस नव्हते. उलटं पोलीस आणि लष्कर सुद्धा शिवसैनिकांना मारत होते आणि दुसऱ्या बाजूने देशद्रोही पण होते. पण तो जो काही एक लढा होता ते जे काही झालं होतं ते विरुद्ध होतं. हे मी आवर्जून का सांगतोय? कारण काही अशी उदाहरणं आहेत. की जिकडे काही वैमनस्य नाही. अशा काही दर्ग्यांच सुद्धा रक्षण शिवसैनिकांनी केलेलं आहे. मला एकूणच भारतीय जनता पक्षाची कीव येते. की एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जाताहेत”, असेही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – “गोमुत्रधारी चंद्रकांत पंडित..” उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना बाबरी मुद्द्यावरून टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -