घरताज्या घडामोडीराज्यपालांचे अभिभाषण म्हणजे मविआ सरकारच्या दिशाहीन, भरकटलेल्या कारभाराचे प्रदर्शन; प्रवीण दरेकरांची टीका

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे मविआ सरकारच्या दिशाहीन, भरकटलेल्या कारभाराचे प्रदर्शन; प्रवीण दरेकरांची टीका

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण सादर केले. मात्र, यंदाच्या अभिभाषणाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारचा दिशाहीन आणि भरकटलेला कारभार पाहायला मिळाला अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना प्रविण दरेकर यांनी आपल्या सुमारे १ तासाच्या भाषणात राज्यपालांच्या अभिभाषणावर टीकेची झोड उठविली. अभिभाषणावर सभागृहातच सत्ताधाऱ्यांमध्ये मतप्रवाह दिसून आला. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी सभागृहाबाहेर वेगवेगळी मते दर्शवली. कोणी म्हणाले विरोधकांना कंटाळून राज्यपाल निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून राज्यपाल निघून गेले, तर काहींनी अभिभाषणाच्या काही ओळी राज्यपाल्यांना वाचायचे नव्हत्या म्हणून राज्यपाल निघाल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचा आरोप करून राज्यपालांनी अर्धवट अभिभाषण सोडले यावर आज टीका करण्याचा प्रयत्न राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर दुर्दैवाने झाल्याची टीका दरेकर यांनी केली. याआधी सन 2007, 2014, 2016 आणि 2018 राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे असे प्रथमच घडले नाही. जनतेची फसवणूक करण्यापेक्षा निघालेले बरे, दाऊदची पाठराखण करणाऱ्या मंत्र्यांची पाठराखण करण्यापेक्षा विधीमंडळातून निघालेले बरे असा विचार राज्यपालांनी बहुधा अभिभाषणाच्यावेळी केला असावा असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

आयजीच्या जीवावर बायजी उदार

राज्यपालांच्या अभिभाषणात एकूण 72 मुद्दे आहेत. त्यापैकी 26 मुद्दे हे कोव्हिड महामारीवेळी सरकारने काय कामगिरी केली यांचे पोवाडे गाणारे आहेत. ज्या ज्या बाबतीत राज्य श्रेय घेऊ पाहतय, ती सगळी कामगिरी खरतर केंद्राने केलेली आहे. सारे श्रेय केंद्राचे आहे. राज्य शासन म्हणते की, 15000 हुन अधिक व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करुन दिल्या. मात्र वास्तवात कोव्हिडची लाट येण्यापुर्वीच 6500 व्हेंटिलेटर राज्याकडे होते. कोव्हीडवेळी केंद्राने 4500 दिले. उरलेल्या 4000 मध्ये 90% सहभाग हा खाजगी होता. राज्याने जेमतेम 1000 व्हेंटिलेटर दिले असतील. म्हणजेच 1000 व्हेंटिलेटर खरेदी करुन 15000 व्हेंटिलेटरचे श्रेय लाटण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. थोडक्यात काय तर आयजीच्या जीवावर बायजी उदार असा चिमटा दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळींना काढला.
किमान आधारभूत योजने अंतर्गत धान्याची भरड, धान्याची जी विक्रमी खरेदी केल्याचे किंवा शेतकऱ्यांना 9445 कोटी पेक्षा अधिक रक्कम प्रदान केल्याच्या फुशारक्या सरकार मारत आहेत, पण या केंद्राच्या योजना आहेत, यामध्ये महाविकास आघाडी सरकारचे कतृत्व काय आहे असा सवाल उपस्थित करतानाच दरेकर म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्तांसाठी एसडीआरएफ व एनडीआरएफ मधून केंद्र शासनाने जवळपास 8000 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला. परंतु त्याचेही श्रेय राज्य सरकारकडून सुरु आहे.


हेही वाचा – ST Employees Protest: एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -