घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदे राज्य सरकार चालवू शकतात पण..., रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर घणाघात

एकनाथ शिंदे राज्य सरकार चालवू शकतात पण…, रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर घणाघात

Subscribe

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. मुख्यमंत्र्यांना बरे होण्यासाठी काही दिवस लागतील पण राज्यातील कारभार कसा चालणार असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस राज्य सरकार चालवू शकतात पण त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नसल्याचा आरोप दानवेंनी केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलावर केलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. सध्या काही सांगण्याची वेळ नाही परंतु त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना लवकर बरे वाटावे माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरे होऊन राज्यातील जनतेची सेवा करावी अशी आमची आणि सगळ्यांची भूमिका आहे. पंरतु तोपर्यंत राज्याला दुसरा प्रमुख नेमला पाहिजे असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे सक्षम माणूस

राज्य मुख्यमंत्र्यांविना कस चालणार? असा प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसचे राज्य चालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस सक्षम आहे. परंतु त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. मग कोणालाही द्या राष्ट्रवादीला द्या किंवा अजित पवारांना द्या परंतु कोणाला तरी संधी दिली पाहिजे असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणेंवरील कारवाई सुडबुद्धीने

या राज्याचे चित्र पाहिले तर राज्याचे गृहमंत्री फरार, मुंबईचे पोलीस आयुक्त फरार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून घरात आहेत. आजारी असल्यामुळे जर राज्यत असे प्रकार घडत असतील तर त्यावर चर्चा कोणाशी करायची? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. भाजप आणि शिवसेनेतील दरी वाढत चालली आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र मिळून निवडणूक लढवली आणि नंतर सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केलं आहे. वेगळं सरकार बनवल असून कोणच्यातरी सांगण्यावरुन सरकार चालत आहे. असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

- Advertisement -

ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार होतात ते सुडबुद्धीने होत असतात. नारायण राणेंच्या मुलावर ३०७ दाखल केला आहे. असा कोणता गुन्हा नितेश राणेंनी केला होता की ज्यावर ३०७ दाखल झाला. पण सुडबुद्धीने जर कोणी राजकीय विरोधक असेल तर त्यांच्यावर असे गुन्हे दाखल करुन नमवण्याचा प्रयत्न केला जातो. भाजप आमदार आशिष शेलारांवरही असाच गुन्हा दाखल केला होता. तो ३०७ चा गुन्हा नाही पण गुन्हा दाखल केला आहे. असे खोटे गुन्हे दाखल जर केले तर कोर्टावर आमचा विश्वास आहे. आम्हाला कोर्टातून न्याय मिळेल असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.


हेही वाचा : 2017 चे वचन पूर्ण करण्यासाठी 2022 निवडणुकीचे वर्ष उजाडले; फडणवीसांची ठाकरेंवर टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -