घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षांची हजेरी, राजकीय भूकंपाची शक्यता

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षांची हजेरी, राजकीय भूकंपाची शक्यता

Subscribe

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला धक्के बसत आहेत.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला आगामी काळात जळगावमध्ये धोका निर्माण होणार आहे. आतापर्यंत अनेक खडसे समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये भाजप नगराध्यक्ष उपस्थित होते. यामुळे खळबळ माजली आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांचे अनेक समर्थक भाजपमध्ये आहेत. तसेच भाजपचे नगराध्यक्ष एकनाथ खडसेंचे निकटवर्तीय मानले जातात. खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आढावा बैठकित भाजप नगराध्यक्ष आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला धक्के बसत आहेत. खडसे यांचे निकटवर्तीय असलेले भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला आगामी निवडणूकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगराध्यक्ष आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. यामुळे या बैठकीची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकीत सावदामधील महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मनोमिलन झाले आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यासपीठावर नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगराध्यक्ष उपस्थित होते. ही बैठक सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मनोमिनल घडवून आणण्यासाठी आयोजित केली असल्याची चर्चा सुरु आहे. या बैठकीमुळे भाजपमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

खडसेविरोधात ईडीचा ससेमीरा

एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यामागे ईडीचा ससेमीरा लागला आहे. या जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच ईडीने एकनाथ खडसे यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे. ते कागदपत्र पुरवणार असल्याचेही एकनाथ खडसेंच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनाही अटक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा :  केंद्रानं आरक्षणासाठीची ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे – शरद पवार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -