घरमहाराष्ट्रयुवराजांचे पर्यावरण प्रेम बोगस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध; भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

युवराजांचे पर्यावरण प्रेम बोगस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध; भातखळकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

Subscribe

आरेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोषित

आरेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोषित करण्यात आला असून यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. आरेमध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालवले असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे. याविरोधात भाजप आंदोलन करेल असा इशारा भातखळकर यांनी दिला.

“आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरेमध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे, हे अत्यंत संतापजनक असून युवराज आदित्य ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णत: बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.”

- Advertisement -

“आरेमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा ठाकरे सरकारने आरे मधील तब्बल ३२३१० वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. इतकेच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या ‘आर्थिक’ संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.”

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -