घरमहाराष्ट्रनाशिकसत्यजित तांबेंच्या प्रचारासाठी भाजपाचे आमदार मैदानात, पदवीधारांशी साधला संवाद

सत्यजित तांबेंच्या प्रचारासाठी भाजपाचे आमदार मैदानात, पदवीधारांशी साधला संवाद

Subscribe

नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून भाजपाने अद्यापही खुला पाठिंबा दिलेला नाही. मात्र, पाठिंबा जाहीर होण्याआधीच भाजपाचे नेते तथा माजी मंत्री आणि आमदार अमरीशभाई पटेल यांनी शिरपूरमध्ये प्रचार मेळावा घेऊन सत्यजित तांबेंना मतदान करण्याचे आवाहन पदवीधरांना केलं आहे.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेसने डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेत त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी देऊ केली. परंतु, तांत्रिक अडचणीचे कारण देत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरला. यावरून काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. उमेदवार बदलाची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर कोणालाही माहीत नसल्याने नाना पटोलेंसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय, पिता-पुत्रांना पक्षातून निलंबित करण्यात आलं.

- Advertisement -

हेही वाचा – “सत्यजित तांबे आजच्या काळातील औरंगजेब”; ‘स्वराज्य’चे उमेदवार सुरेश पवारांची गंभीर उपमा

दरम्यान, सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ, अशी खुली भूमिका भाजपाच्या नेत्यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या या फुटीमागे भाजपाचा हात असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. त्यातच, आता दस्तुरखुद्द भाजपाचेच नेते सत्यजित तांबेंच्या प्रचारासाठी येत असल्याने भाजपा लवकरच त्यांना पाठिंबा जाहीर करू शकते.

- Advertisement -

माजी आमदार सुधीर तांबे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे आणि सत्यजित तांबे यांनी नेहमीच केलेल्या सहकार्यामुळे त्यांचा प्रचार करत असल्याची माहिती आमदार अमरिश पटेल यांनी दिली.

काँग्रेसचा उमेदवार फुटल्याने आता महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या त्या स्वीकृत उमेदवार असतील.

हेही वाचा – मतमोजणीसाठी २९ टेबल, ८७ कर्मचार्‍यांची नियुक्ती; पदवीधर मतमोजणी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -