अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगितले जात आहे.

अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगितले जात आहे. गुरवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून तामिळनाडूतील इरोड येथे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने या घटनेत श्री श्री रविशंकर कोणतीच दुखापत झालेली नाही. (helicopter carrying sri sri ravi shankar made emergency landing due to bad weather in erode)

मिळालेल्या माहितीनुसार, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासह आणखी चार जण होते. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले.

गुरुवारी सकाळी 10.40 वाजताच्या सुमारास इरोड येथील सत्यमंगलम येथे श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर आकाश निरभ्र झाल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. त्यावेळी सुमारे 50 मिनिटांनी हेलिकॉप्टरने उड्डाण केले.


हेही वाचा –शिंदे गट-भाजपासोबतच्या युतीत डावललं जातं, अखेर आठवलेंनी व्यक्त केली खंत