घरताज्या घडामोडीसगळे एकमेकांना लाचारीनं चिकटलेत, काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद; सुजय विखे पाटलांची टीका

सगळे एकमेकांना लाचारीनं चिकटलेत, काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद; सुजय विखे पाटलांची टीका

Subscribe

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि तब्बल ३९ दिवस उलटून गेल्यानंतर राज्यमंत्री मंडळाचा विस्तार झाला. मंत्रीमंडळाच्या खाते वाटपाचा मुहूर्त अद्यापही लागलेला नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. दरम्यान, सगळे एकमेकांना लाचारीनं चिटकलेत. त्यामुळे काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद वाटतोय, अशी टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

१८ मंत्र्यांचा शपथ विधी सोहळा पार पडल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं दिलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात खातं वाटप झालेलं नसलं तरी कुणाचंही काम अडलेलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही सक्षम नेते आहेत. ते राज्याच्या हिताचे निर्णय घेताहेत, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

- Advertisement -

सामनामधून बिनखात्याचे मंत्रिमंडळ अशी टीका करण्यात आली आहे. येत्या १७ तारखेला अधिवेशन असून त्याअगोदर कुठल्याही परिस्थितीत खाते वाटप होईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवं आहे. काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद वाटतोय. त्यांच्यात महाविकास आघाडी सोडण्याची हिम्मत नाही. एवढं सगळं होऊनही ते बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेत, असा टोला सुजय विखे पाटलांनी काँग्रेसला लगावला आहे.


हेही वाचा : प्रतिशिवसेना भवनावरून उदय सामंतांचा खुलासा, म्हणाले जनतेला भेटता येण्यासाठी…

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -