घरताज्या घडामोडीElection 2024 : लोकसभेसाठी भाजप-सेनेचा २६-२२चा फॉर्म्युला ठरला?

Election 2024 : लोकसभेसाठी भाजप-सेनेचा २६-२२चा फॉर्म्युला ठरला?

Subscribe

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सध्या सत्तेत असलेले शिंदे-फडणवीस सरकार हे आगामी निवडणुका एकत्र लढवणार आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार कामाला सुरूवात झाली आहे. त्यासाठी भाजप आणि शिंदे गटात लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभेत शिवसेना ४८ पैकी २२ जागा तर भाजप २६ जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

२२ जागांसाठी तयारी करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार आणि अन्य नेत्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली आणि याच बैठकीत या सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पण भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्यापही लोकसभेच्या जागा वाटपाबाबत कोणतीही बैठक झालेली नाही अशीही माहिती मिळाली आहे. मात्र आगामी काळात येणाऱ्या निवडणुकींसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार कामगिरी केली जात आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत १३ खासदारांच्या मतदार संघाचा आढावा घेतला. तसेच उर्वरीत ९ उमेदवार कोण असतील?, याबाबत शोधण्याचं काम सध्या सुरु असल्याची चर्चा देखील सुरू आहे. पण भाजपसोबत होणाऱ्या बैठकीनंतरच शिवसेनेला २२ पेक्षा जास्त जागा मिळणार की कमी?, हे समोर येणार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि फडणवीस यांचा लोकसभेसाठी काय फॉर्म्युला असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपच्या गळाला; ‘या’ नेत्यानं केलं खळबळजनक वक्तव्य

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -