घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात खडसे, मुंडेंची गरज संपल्यानंतर फेकून दिले, संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

महाराष्ट्रात खडसे, मुंडेंची गरज संपल्यानंतर फेकून दिले, संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

Subscribe

भाजपला जेव्हा सत्ता हवी होती, तेव्हा हिंदुत्व समोर आले. भाजपकडून काम झाल्यानंतर फेकले जाते. राजकारणात आवश्यकता संपल्यावर दूर केले जाते, हेच त्यांचे धोरण आहे. वापरा आणि फेकून द्या हेच भाजप राजकारणात करते. गरज संपली, तर फेकून देण्याचे काम भाजपकडून आजवर झाले आहे. गोव्यात लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांच्याबाबत काय झाले हे पाहिलेच असेल. तुम्ही पाहिलच असेल महाराष्ट्रात एकनाथ खडसेंचे काय झाले ? मुंडे परिवाराचे काय झाले ? संपूर्ण देशात हे असेच सुरू आहे, रामविलास पासवान परिवाराचे काय झाले हेदेखील सगळ्यांनी पाहिले आहे.

आम्हाला आमची ताकद माहिती आहे. आम्हाला आमचा आत्मविश्वासच आम्हाला पुढे घेऊन जाणार. आम्हाला आव्हान दिले तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील अशा कडक शब्दात त्यांनी भाजपला इशारा दिला. ईडी, सीबीआय असो केंद्राची सत्ता असो कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही घाबरणार नाही.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना बोलताना पाहूनच विरोधकांची झोप उडाली आहे. विरोधकांकडून टीका होत होती की, त्यांना बोलता, चालता येत नाही. पण मुख्यमंत्री कार्यालयात चालत आले आणि शिवसेनेला, महाराष्ट्राला, राष्ट्राला संबोधित केले. शिवसेना स्वबळावर पुढे जाईल आणि देशाच्या राजकारणात आत्मविश्वासाने पावल पुढे टाकेल हेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची त्यांनी आठवण करून दिली. शिवसेनेची पावले दिल्लीच्या दिशेने आहेत. आगामी काळात शिवसेनेचा विस्तार, संघर्ष करण्यासाठी पावले उचलणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्ष्ट केले. त्यासाठी प्रत्येक राज्यात निवडणूका लढवू. आम्ही गोवा, यूपीमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत. दादरा नगर हवेली लोकसभेत आम्ही जिंकलो आहोत. दक्षिण गोव्यातून आम्ही निवडणुक लढतो आहोत.

चिलखत काढून लढा 

चित्रपटांमध्ये एक नेहमीच वाक्य असते की, वर्दी निकाल फिर मेरे गल्ली मे आना. भाजपची ईडी, सीबीआय चिलखत आहेत. राजकीय शत्रूशी ही चिलखत घालूनच केंद्रातील सत्ताधारी लढत असतात. ही चिलखत काढून मैदानात, नाय मातीत लोळवल, गाडल तर शिवसेना नाव सांगणार नाही. आम्ही यापुढेही लढणार आहोत ही आमची ठाम भूमिका आहे. आम्ही सगळेच लढतो आहोत. भाजप काय करणार आहे ? खोट्या प्रकरणात तुरूंगात टाकाल, गोळी माराल, आयटी सेलद्वारे बदनामी करणार ना ? अशाने तुम्ही शिवसेना संपवू शकत नाही.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -