घरताज्या घडामोडीगॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

Subscribe

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दरवाढीविरोधात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.

पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई कि मार… अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव ९५ रुपये तर डिझेलचे भाव ८४ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल देखील अ‍ॅड. पगार यांनी यावेळी बोलतांना केला. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र डोखळे, हरिश्चंद्र भवर, बबन शिंदे आदींची भाषणे झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -