घरमहाराष्ट्रनाशिककरोना बाधितांसाठी नाशकातील मनसैनिकांनी केले रक्तदान

करोना बाधितांसाठी नाशकातील मनसैनिकांनी केले रक्तदान

Subscribe

राज्यभर करोना बाधितांचा आकडा वाढतच असून त्यामुळे आता सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पक्षातील पदाधिकार्‍यांच्या वतीने नाशिकमधील राजगड कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिकांनी उपस्थिती दर्शविली. शिबिरात रक्तदात्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस रविवारी (दि. १४) साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या भव्य शिबिराप्रसंगी पक्ष कार्यकारिणी, महिला सेना, विध्यार्थी सेना व सर्व अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदानाच्या उपक्रमाचा फायदा असंख्य रुग्णांना होणार आहे.

राजगडवर झाले वृक्षारोपण

- Advertisement -

पक्ष प्रमुख राज ठाकरे हे नेहमीच पर्यावरण संवर्धनाचा आग्रह धरतात. या पर्यावरण प्रेमाची पावती म्हणून राजगड कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.

करोना बाधितांसाठी नाशकातील मनसैनिकांनी केले रक्तदान
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -