1993’च्या बॉम्बस्फोट मालिकेची पुन्हा धमकी; आरोपीला पोलिसांकडून अटक

1993च्या बॉम्बस्फोटाची आठवण झाल्यास आजही अंगाला शहारे उटतात. अशातच पुन्हा एकदा मुंबईला 1993च्या बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.

MUMBAI_POLICE

1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा राईट हॅण्ड मानला जाणारा टायगर मेमन होता. परंतु, या बॉम्बस्फोटप्रकरणी टायगरचा भाऊ याकूब मेमनला अटक करून फाशी देण्यात आली होती. 1993च्या बॉम्बस्फोटाची आठवण झाल्यानंतर अनेकांच्या अंगावर आजही शहारे येतात. अशातच पुन्हा एकदा मुंबईत 1993च्या बॉम्बस्फोटाप्रमाणे बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. (Bomb Blast Like 1993 Will Happen In Mumbai Again Threat Call In Mumbai Police Control Room)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 1993 सारखा स्फोट दोन महिन्यात होणार असल्याचा धमकीचा फोन पोलिस कंट्रोल रुममध्ये आला. या धमकीच्या फोनचा शोध घेतला असता, या फोनप्रकरणी मालाडमधून एकाला अटक करण्यात आली आहे. माहीम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा या फोन कॉलमधून करण्यात आला आहे. तर बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी मुंबई एटीएसने तपास करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचे या फोनवर सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई एटीएसने हा फोन ज्या व्यक्तीने केला, त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होता. मुंबई आकाराचे देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचे सांगितले आहे. या फोननंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपासणी केली होती.


हेही वाचा – थेट सरपंच निवडीला विरोध करणारे म्हणतात, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही थेट निवडा!