शाहरुखचा डुप्लीकेटला बघितलंय का? दिसतो एकदम सेम टू सेम

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागील काही दिवसांपासून त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामुळे अनेकांनी शाहरुखला ट्रोल देखील केलं. तर काहींनी त्याच्या लूकचं कौतुक केल. शाहरुख खानचे जगभरात लाखो चाहते आहेत. अशातच शाहरुख सारखा अगदी सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या व्यक्तीचं नाव इब्राहिम कादरी असून तो देखील शाहरुखचा मोठा चाहता आहे. तो शाहरुखच्या अनेक गाण्यांवर रिल्स शेअर करत असतो. इब्राहिमचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ibrahim qadri (@ibrahim__qadri)

नुकताच इब्राहिमने शाहरुखच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्याचे रिल्स देखील बनवले आहेत. यातील इब्राहिमचे हाव-भाव, लूक, स्टाईल अगदी शाहरुख सारखी दिसतेय. इब्राहिमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून शाहरुखचे चाहते यावर अनेक कमेंट्स करत आहेत.

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट हिंदीव्यतिरिक्त, तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

देशातील मुलींनी उर्फीकडून काहीतरी शिकावं… हनी सिंहकडून कौतुक