घरमहाराष्ट्रDeepak Tijori : पोलीस कल्याण निधीसाठी 25 हजार जमा करा; हायकोर्टाचे दीपक...

Deepak Tijori : पोलीस कल्याण निधीसाठी 25 हजार जमा करा; हायकोर्टाचे दीपक तिजोरीला आदेश

Subscribe

अमर मोहिते

मुंबईः अभिनेता दीपक तिजोरी व निर्माता मोहन नादर यांनी प्रत्येकी 25 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. या सुनावणीसाठी दीपक तिजोरी न्यायालयात हजर होते.

- Advertisement -

दीपक तिजोरी यांनी मोहन नादर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नादर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. नितीन साम्बरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खडंपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी माझी काही हरकत नाही, असे तिजोरी यांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. तुम्ही पोलीस खात्याचा वापर करुन घेतला आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनीही प्रत्येकी 25 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असे आदेश देत न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला.

दीपक तिजोरी यांनी 15 मार्च 2023 रोजी आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत नादर यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. दीपक तिजोरी यांना पैस मिळण्यासाठी उशीर झाला. म्हणून त्यांनी हा गुन्हा नोंदवला, असा दावा करत नादर यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.

- Advertisement -

मोहन नादर यांनी अनेक हिंदी व इंग्रजी चित्रपटांची निर्मिती केली आहे. दीपक तिजोरी यांचीही निर्मितीची कंपनी आहे. मी त्यांना पैसे देणार आहे. पैसे देण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे पैसे वसुल करण्यासाठी दीपक तिजोरी यांनी माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे, असा दावा मोहन नादर यांनी याचिकेत केला होता.

2019 मध्ये मला राहुल मित्रा भेटले होते. ते आणि मी TIPSY नावाच्या चित्रपटाची निर्मिती करणार होतो. नंतर त्यांनी दीपक तिजोरी यांच्याशी ओळख करुन दिली. आमचा चित्रपट निर्मितीचा करार झाला. चित्रपट निर्मितीसाठी 9 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार होता. चित्रपटाची कथा न आवडल्याने एका अभिनेत्याने चित्रपटास नकार दिला. नंतर कोरोनामुळे चित्रिकरणच झाले नाही. त्यामुळे आम्ही चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्मिती बंद केल्याने मी दीपक तिजोरी यांना एक कोटी रुपये देणार होतो. सहा महिन्यात मला हे पैसे द्यायचे होते, असे नादर यांनी याचिकेत नमूद केले होते.

कोरोनामुळे होतो लंडनमध्येच

कोरोनामुळे मी लंडनमध्येच होतो. मला भारतात येता आले नाही. परिणामी मला पैसे वेळेवर देता आले नाही. मी वारंवार दीपक तिजोरी यांना सांगत होतो की मी पैसे परत करेन. मी महिन्याला पाच लाख परुये देण्याचा प्रस्ताव दीपक तिजोरी यांच्यासमोर ठेवला. तो पर्याय दीपक तिजोरी यांनी मान्य केला. 6 डिसेंबर २०२२ रोजी आमच्यात हा करार झाल. फेब्रुवारी 2023 पर्यंत मी त्यांना टप्प्या टप्प्याने पैसे दिले. मी दीपक तिजोरी यांना मार्च 2023 पर्यंत 40 लाख रुपये दिले. मी पैसे द्यायला तयार होतो तरीही दीपक तिजोरी यांनी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केले.

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -