घरमहाराष्ट्रलाचखोर अभियंता आणि वायरमनला २० वर्षांनी शिक्षा; हायकोर्टाचा निकाल

लाचखोर अभियंता आणि वायरमनला २० वर्षांनी शिक्षा; हायकोर्टाचा निकाल

Subscribe

अमर मोहिते

मुंबईः सोलापूर महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता बाबूराव म्हेत्रे, वायरमन इलाही शेखला लाच घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. म्हेत्रेला एक वर्षांची तर शेखला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांना २००३ मध्ये लाच घेताना अटक झाली होती. संशयाचा फायदा देत सोलापूर सत्र न्यायालयाने या दोघांची निर्दोष सुटका केली होती. सोलापूर सत्र न्यायालयाचा हा निकाल उच्च न्यायालयाने रद्द केला.

- Advertisement -

यातील तक्रारदाराचे सोलापूर येथे दुकान आहे. सप्टेंबर २००३ मध्ये या दुकानाचे वीजचे बिल सुमारे सात हजार रुपये आले. तक्रारदाराने सोलापूर महावितरण विभागात कनिष्ठ अभियंता म्हेत्रे आणि वायरमन शेख यांची भेट घेतली. म्हेत्रे आणि शेख तक्रारदाराच्या दुकानात आले. चुकीची वायरींग झाली असल्याचे सांगून दुकानाची वीज कापण्यात आली. तक्रारदाराने वीज कनेक्शन पुन्हा सुरु करण्याची विनंती केली. यासाठी म्हेत्रे यांनी पाच हजार रुपये तर शेख यांनी तीन हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याची तक्रार केली. त्यानुसार एसीबीने म्हेत्रे आणि शेखला अटक करण्यासाठी सापळा रचला. एसीबीच्या पथकाने म्हेत्रेला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शेख यांच्यावतीने दुसऱ्या व्यक्तिने तीन हजार रुपये तक्रादाराकडून घेतले. त्यालाही एसीबीच्या पथकाने अटक केली.

या दोघांविरोधात सोलापूर विशेष सत्र न्यायालयात खटला चालला. सत्र न्यायालयाने १७ जानेवारी २००४ रोजी याचा निकाल देत या दोघांची निर्दोष सुटका केली. या निकालाविरोधात राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली.

- Advertisement -

न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर राज्य शासनच्या अपील याचिकेर सुनावणी झाली. न्यायालायने म्हेत्रे आणि शेखला निर्दोष सोडणारे सोलापूर सत्र न्यायालयाचे आदेश रद्द केले. न्यायालयाने म्हेत्रेला एक वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच शेखला सहा महिन्यांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास या दोघांना अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -